AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदेश झुगारुन धबधब्यावर, पांडवकडा धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू

खारघरमधील पांडवकडा गोल्फ कोर्सलगत असलेल्या डोंगरावर पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या 3 तरूणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

आदेश झुगारुन धबधब्यावर, पांडवकडा धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू
kharghar pandavkavada
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 6:21 PM
Share

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा गोल्फ कोर्सलगत असलेल्या डोंगरावर पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या 3 तरूणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. काल (22 जून) संध्याकाळच्या सुमारास हे तिघे तरुण पांडवकवडा डोंगरावर गेले होते. मात्र डोंगरात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा आणि वाहत्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने यातील एका तरुणाचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. (young boy drowned and died in Pandavkada waterfall Kharghar Navi Mumbai)

पांडवकडासह खारघर हीलवर जाण्यास बंदी

खारघर मधील पांडवकडा परिसरात अनेक छोटे मोठे धबधबे आहेत. त्याचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. मात्र पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने कुठलाही अनर्थ घडू नये यासाठी पोलिसांनी पांडवकडासह खारघर हीलवर धरणावर जाण्यास बंदी घातली आहे. मात्र काही पर्यटक या आदेशाला झुगारून चोर रस्त्याने पांडवकडा परिसरात जात असतात.

मौसम घरती वर आलाच नाही

काल सायंकाळी तीन मित्र धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर 22 जून रोजी मानखुर्द गोवंडी इथले मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सुरज यादव, मौसम घरती आणि राहील खान हे संध्याकाळी आले होते. त्यात गौरव लोखंडे, राहिल खान आणि मौसम घरती यांनी डोहामध्ये उड्या मारल्या. उडी मारल्यानंतर गौरव आणि राहील वर आले. मात्र, मौसम घरती हा वर आलाच नाही.

पाण्यात गळ टाकून मौसम घऱतीचा शोध

त्यानंतर घाबरलेल्या इतर मित्रांनी नवी मुंबई कंट्रोलला कळवले. त्याप्रमाणे फायर ब्रिगेड आणि खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यात गळ टाकून तसेच प्रत्यक्ष स्वीमर पाठवून मैसम घऱती याचा शोध घेतला. अखेर आज सकाळी फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी डोहातील खडकाखाली अडकलेले मौसम घरती याचा मृतदेह बाहेर काढला.

आदेश न झुगारण्याचे पोलिसांचे आवाहन

मौसम घरती याचा नातेवाईकांना माहिती दिली असून मृतदेह पोस्टमृॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तर पनवेलचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि खारघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी पावसाळा सुरू होताच पाडंवकडा इथे येऊ नये, मनाई आदेश झुगारल्यास कारवाई केली जाईल अशा सूचना दिल्या होत्या. तरीही लोक थोड्याशा मजेसाठी धबधब्यावर जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यात काहींना जीवही गमवावा लागतोय. त्यामुळे पुन्हा एकदा पनवेल पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी खारघर इथल्या डोंगरात जाऊ नये असे आवाहन केलंय.

इतर बातम्या :

विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल

रुमालाने तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधले, 23 वर्षीय विवाहितेची विहिरीत आत्महत्या

कर्ज फेडण्यासाठी नातेवाईकांच्या दागिन्यांवर डल्ला, तरुणाला अटक

(young boy drowned and died in Pandavkada waterfall Kharghar Navi Mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.