AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाला स्वस्त, पण स्थानिक बाजारपेठेतील दर चढेच

Vegetable prices | किरकोळ बाजारात कुठल्याही नियंत्रण नसल्याने किरकोळ विक्रीत काही भाज्या दुपटीने तर काही पाचपटीने विकल्या जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप पहायला मिळत आहे.

नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाला स्वस्त, पण स्थानिक बाजारपेठेतील दर चढेच
भाजीपाला
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 1:59 PM
Share

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास 540 गाड्यांची आवक असून भाजीपाल्याच्या काही अंशी दरात वाढ झाली आहे. परंतु मुंबईसह उपनगरांमध्ये किरकोळ भाजीपाला विक्री 100 ते 150 रुपये किलोने होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर घाऊक बाजारात वाटाणा आणि फरसबी वगळता सर्वच भाज्या 50 रुपये किलोच्या आतमध्ये असताना किरकोळ बाजारात एवढे दर कसे, असा सवाल ग्राहक विचारत आहेत. तर याबाबत घाऊक बाजारात सुद्धा व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर किरकोळ बाजारात एवढ्या मोठ्या फरकाने भाजीपाला विकला जात असल्याने गृहिणी हवालदिल झाल्या असून बजेट कोलमडल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.(Navi Mumbai APMC market Vegetable prieces)

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजचे बाजारभाव वाटाणा 70 ते 80, फरसबी 70 ते 80, शिमला मिरची 15 ते 20, हिरवी मिरची 25 ते 20, लाल मिरची 20 ते 22, कोबी 8 ते 10, फ्लावर 10 ते 12, गवार 35 ते 40, भेंडी 25 ते 28, शेवगा 50 ते 60, लाल वांगी 25 ते 30, हिरवी वांगी 30 ते 35, दुधी 10 ते 15, टोमॉटो 10 ते 12, चवळी 30 ते 35 , काकडी 12 ते 14, कारली 30 ते 35, तोंडली 30 ते 35 रुपये प्रतिकिलो आहेत.

किरकोळ बाजारात कुठल्याही नियंत्रण नसल्याने किरकोळ विक्रीत काही भाज्या दुपटीने तर काही पाचपटीने विकल्या जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप पहायला मिळत आहे.

लासलगाव बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक; 27 दिवसांत 180 कोटींची उलाढाल

आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 27 दिवसात कांद्याची 11 लाख 70 हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत तब्बल 180 कोटी रुपयांची उलाढाल झाली. नाशिक जिल्ह्यातील कोव्हीड-19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दि. 12 मे, 2021 ते 23 मे, 2021 अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. त्यानंतर दि. 24 मे, 2021 पासुन जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले दि. 24 मे, 2021 ते 21 जुन, 2021 ह्या कालावधीत लासलगांव बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर 11 लाख 70 हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: एपीएमसी बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किंमतीत 30 रुपयांची घट

लासलगाव बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक; 27 दिवसांत 180 कोटींची उलाढाल

वजनात ‘झोल’ करणाऱ्या रेशन दुकानदारांना झटका; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

(Navi Mumbai APMC market Vegetable prieces)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.