काँग्रेस स्वबळावर लढणार?, विजय वडेट्टीवार म्हणतात, हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही

| Updated on: Jul 16, 2021 | 4:41 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. (vijay wadettiwar)

काँग्रेस स्वबळावर लढणार?, विजय वडेट्टीवार म्हणतात, हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us on

अलिबाग: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकांना अजून तीनस साडेतीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं सांगितलं. त्यामुळे स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचं दिसून आलं आहे. (congress high command will take decision for alliance in maharashtra poll, says vijay wadettiwar)

विजय वडेट्टीवार आज अलिबागमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी कुणावरही टीका केलेली नाही. ते पक्षवाढीचं काम करताहेत त्‍यासाठी हायकमांडने त्‍यांना पाठवलं आहे. शब्‍दाच्‍या अर्थाचा अनर्थ करून महाविकास आघाडीत अस्थिरता आहे हे दाखवायचं हा नवा धंदाच विरोधी पक्षांनी सुरू केलेला आहे. तिन्ही पक्षांमध्‍ये उत्‍तम समन्‍वय आहे. पाच वर्षे हे सरकार टिकणार आहे. कितीही आरोप केले, सरकारला बदनाम केलं तरी सरकारला काहीच धोका नाही. आज जाईल, उद्या जाईल म्‍हणता म्‍हणता या सरकारने दीड वर्ष पूर्ण केली आहेत. पुढची साडेतीन वर्षेही पूर्ण होतील, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

हायकमांडच निर्णय घेतील

तिन्ही पक्षांचा अजेंडा महाराष्ट्र विकासाचा आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची देशातील नंबर वनचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे यश आहे. त्‍यामुळे आघाडीत भांडण लावण्‍याची संधी विरोधी पक्ष शोधत आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडी दुखावली जाईल असं कोणतंही विधान नाना पटोले यांनी केलेलं नाही. आघाडीतील कोणाचाही अपमान होईल, असंही वक्तव्य त्यांनी केलं नाही. पक्षाची बाजू मांडत असताना ते स्‍वतंत्र लढण्‍याची भूमिका ठेवत असतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला अजून तीन साडेतीन वर्षे वेळ आहे. त्‍यावेळी जी परिस्थिती असेल त्यानुषंगाने हायकमांड निर्णय घेतील. आता तरी हा‍ विषय फारसा गांभीर्याने घेण्‍याची गरज नाही, असं ते म्हणाले. (congress high command will take decision for alliance in maharashtra poll, says vijay wadettiwar)

 

संबंधित बातम्या:

संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही : चंद्रकांत पाटील

ज्या अनिल देशमुखांची ईडीनं 4 कोटींची संपत्ती जप्त केली, ते नेमक्या किती प्रॉपर्टीचे धनी?

काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्व तयार होऊ द्यायचेच नाही; हंसराज अहिर यांचा आरोप

(congress high command will take decision for alliance in maharashtra poll, says vijay wadettiwar)