संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही : चंद्रकांत पाटील

संजय राठोड (Sanjay Rathod) आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना (Shiv Sena) तर बिलकुल नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : “संजय राठोड (Sanjay Rathod) आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना (Shiv Sena) तर बिलकुल नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राठोड यांना क्लीन चीट देणं चिंताजनक आहे. संजय राठोड यांच्याबाबतची जनहित याचिका कोर्टात आहे. हा न्यायालय आणि पोलीस प्रशासनाचा विषय आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं की घेऊ नये हा शिवसेनेचा विषय आहे. त्यांच्यावर आरोप आहेत की नाही हे चारही बाजूने पाहून घ्या. राठोड काही आमचे दुश्मन नाहीत आणि शिवसेना तर आमची बिलकुल दुश्मन नाही. एखाद्याने गुन्हा केला तर त्याला शिक्षा होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे गुन्हेगाराला शासन होतं हे सामान्य लोकांना वाटतं”

चित्रा वाघ आक्रमक 

एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राठोड प्रकरणात नरमाईची भूमिका घेतली असताना, तिकडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे.   चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

“आज सकाळी मी बातम्या पहिल्या. शिवसेना नेते संजय राठोड यांना क्लीन चीट देण्याची बातमी होती. त्यामुळे मी आज सकाळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी बोलले. त्यांनी क्लीन चीट दिली नसल्याचं सांगितले. मात्र पोलिसांनी प्रेस घेऊन किंवा नोट काढून माहिती द्यावं”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

हा महाराष्ट्राला फसवायचा डाव आहे. मी गृहमंत्र्यांशी बोलणार आहे. संजय राठोड यांच्यावर आत्महत्येला कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करा, अशी आमची मागणी आहे. कंट्रोल रूम वरून एक खाजगी नंबर देण्यात आला होता. त्यावर जे बोलणं झालं ते जाहीर करा. आम्ही या प्रकरणात कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. कॉल रेकॉर्डिंगची माहिती कोण देणार? इतक्या बातम्या येत असताना जर पुण्याचे CP काही बोलत नसतील तर ते चुकीचं आहे, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला.

त्यांनी प्रेस नोट काढली पाहिजे. आम्हाला सांगायचं क्लीन चीट नाही, पण त्यावर काही बोलायचं हे पोलीस आयुक्तांचं चुकीचं आहे. संजय राठोडांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. औरंगाबाद खंडपीठाने मेहबूब शेख प्रकरणात तपासावर ताशेरे ओढले होते. तसाच इथे प्रकार आहे. मूठभर पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. क्लीन चिट देण्याची घाई लागली आहे, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

संजय राठोडांना पुणे पोलिसांनी क्लीन चीट दिल्याची चर्चा

राज्यभरात गाजलेल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांसमोर तरुणीच्या आई वडिलांनी जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राठोड यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

आमचा कोणावरही आरोप नाही, मुलीच्या मृत्यूनंतर या विषयाला राजकीय वळण दिले गेले. त्यानंतर जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता, असा जबाब तरुणीच्या पालकांनी पुण्यातील वानवडी पोलिसांकडे नोंदवल्याची माहिती आहे.

VIDEO : चित्रा वाघ यांची पत्रका परिषद 

संबंधित बातम्या  

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांची क्लीन चिट? 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI