Corona Update: परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल कोरोना पॉझिटिव्ह! सोशल मीडियावरून दिली माहिती!

| Updated on: Dec 29, 2021 | 11:59 AM

लसीकरणाच्या मोहिमेत स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करणाऱ्या परभणीच्या डॅशिंग जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनाच कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आला आहे.

Corona Update: परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल कोरोना पॉझिटिव्ह! सोशल मीडियावरून दिली माहिती!
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल
Follow us on

परभणीः जिल्हाधिकारी आंचल गोयल (Aanchal Goyal) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सकाळी त्यांनी समाज माध्यमांवरून माहिती दिली. तसेच मागील आठ दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोव्हिड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आंचल गोयल यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आंचल गोयल यांनी लसीकरणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. 27 डिसेंबर रोजी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आगामी लसीकरणाच्या महामोहिमेविषयी माहितीदेखील दिली होती.

परभणीत मोठी लसीकरण मोहीम

परभणी जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा टक्का वाढावा, यासाठी 30 आणि 31 डिसेंबर रोजी विशेष लसीकरण मोहीम घेतली जाणार आहे. दोन्ही दिवस सलग 16 तास सर्वच केंद्रांवरून नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. ‘नवीन वर्षाच्या आगमन, करु या सलग लसीकरण’ या ब्रीद वाक्याखाली ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली होती. मात्र या पत्रकार परिषदेनंतर दोनच दिवसात जिल्हाधिकाऱ्यांचाच अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

‘संपर्कात आलेल्यांनी तपासण्या कराव्यात’

दरम्यान, मागील आठ दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांनी कोरोना तपासण्या करुन घ्यावात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या-

अवकाळी पाऊस बेतला जीवावर, वीज कोसळल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, रब्बीतील पिकेही आडवी

Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा