बाबासाहेब पुरंदरे यांची इतिहासाची मांडणी विकृत आणि अनैतिहासिक; जयसिंग पवार भूमिकेवर ठाम

| Updated on: Dec 02, 2022 | 12:53 PM

राज ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा होता. त्यावेळी त्यांनी माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. त्यावेळी इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली.

बाबासाहेब पुरंदरे यांची इतिहासाची मांडणी विकृत आणि अनैतिहासिक; जयसिंग पवार भूमिकेवर ठाम
बाबासाहेब पुरंदरे यांची इतिहासाची मांडणी विकृत आणि अनैतिहासिक; जयसिंग पवार भूमिकेवर ठाम
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध इतिहासकार जयसिंग पवार यांची भेट घेतली होती. यावेळी जयसिंग पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मांडणीचं समर्थ केल्याची चर्चा होती. मात्र, या केवळ अफवा असल्याचं जयसिंग पवार यांनी म्हटलं आहे. पुरंदरे यांची मांडणी विकृत आणि अनैतिहासिक होती, यावर मी ठाम आहे. माझ्या विधानाचा सोशल मीडियात विपर्यास करण्यात आलाय, असा खुलासा जयसिंग पवार यांनी केला आहे. जयसिंग पवार यांनी पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

राज ठाकरे निघून गेल्यावर मी मीडियााशी संवाद साधला. त्यावेळी मला पुरंदरेंबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा मी इतिहासकार म्हणून त्यांचं गौरवीकरण करणारं विधान केलेलं नाही. कारण मी आतापर्यंत लिखाणातून आणि संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे. आणि त्यावर आजही ठाम आहे, असं जयसिंग पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पुरंदरेंबाबत मी जे बोललो त्याबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाला. त्यातून माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. म्हमून मी हा खुलासा करत असल्याचं पवार यांनी त्या पत्रात नमूद केलं आहे.

राज ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा होता. त्यावेळी त्यांनी माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. त्यावेळी इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटातून होणारा विपर्यास यावरही चर्चा झाली, असं त्यांनी म्हटलं आहे.

मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल तर मी त्याचे स्वागत करेन, असं मी म्हणालो होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

माझ्या राज ठाकरे यांच्या बद्दलच्या या विधानाची माध्यमांमध्ये अतिशोयक्ती झाली. यावेळी राज ठाकरे यांच्याशी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.