चंद्रपुरात रोजगारासाठी उपोषण, 9 दिवसांपासून आंदोलन, आंदोलकाची प्रकृती चिंताजनक

चंद्रपुरात रोजगारासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. सहा तरूण आणि दोन महिला नऊ दिवसांपासून उपोषणावर आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासन मात्र या आंदोलनाबाबत गाफील असल्याचं दिसून येतंय.

चंद्रपुरात रोजगारासाठी उपोषण, 9 दिवसांपासून आंदोलन, आंदोलकाची प्रकृती चिंताजनक
चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसलेले आंदोलक.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 2:54 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी (to get employment) काही तरूण-तरुणींनी बेमुदत उपोषण पुकारले. सात मार्चपासून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला नऊ दिवस उलटले. मात्र, अद्यापही प्रशासनाची नजर उपोषणकर्त्यांवर पडली नाही. मागणी फार मोठी नाहीच. चंद्रपूर जिल्ह्यात (in Chandrapur district) अनेक कंपन्या आहेत. त्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे, ही माफक मागणी आहे. मागणीसाठी उपोषणाला बसलेले आकाश डोंगरे (Akash Dongre) याची प्रकृती चिंताजनक आहे. रोजगारासाठी अंतिम टोकापर्यंत पोहचायला मनसे आणि स्थानिक तरूण, तरुणी तयार झालेत. तेही औद्योगिक जिल्ह्यात..! कंपनीत परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात आहे, तर दुसरीकडे भूमिपुत्रांना रोजगारासाठी आंदोलन करावे लागावे. यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती ?

आंदोलकांनी भोगला कारावास

स्थानिक युवकांना बाहेर पुणे, मुंबईला रोजगारासाठी नाईलाजाने जावे लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात 2010 पासून उद्योगात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी वेळोवेळी आंदोलन करीत आहे. एका आंदोलनात मनदीप रोडेंसह 40 कार्यकर्त्यांनी साडेतीन महिने कारावास भोगला आहे. परराज्यातील नागरिकांना रोजगार दिला जात असल्यानं स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या

जिल्ह्यातील खासगी उद्योग व कंपनी तसेच वेकोली अंतर्गत खासगी कंपनी स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्यात यावी. रोजगार मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनसे व गावकरी, महिलांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. यासह इतर मागण्या निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. अमा पिंपळशेंडे, मंगेश तुमसरे, पंढरी तुमसरे, आकाश डोंगरे, महारत्न लोहकरे आदी उपोषणाला बसले आहेत.
आंदोलनाला स्थानिक बेरोजगार युवकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

गडचिरोलीत अवैध खंडणी वसुली, बोगस बंदुकधारी नक्षलवादी जेरबंद, काय आहे प्रकरण?

नागपूर शिवसेनेत मोठे फेरबदल, संजय राऊतांनी घातले लक्ष, आता दोन महानगरप्रमुख

विदर्भात थंडी संपली आता उन्हाचे चटके, पारा पोहोचला 38 अंशावर, हवामानाचा अंदाज काय?