Chandrapur Leopard | चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातील मादी बिबट वनविभागाच्या जाळ्यात; तीन वर्षीय मुलीवर केला होता हल्ला

तीन महिन्यांपासून धुमाकूळ मानवी जीवितास धोकादायक ठरले होते. या बिबट्यबाबत जनतेत प्रचंड आक्रोश होता. त्याला वरिष्ठांकडून गोळीबाराचे आदेश दिले होते. वनविभागाचे पथक गेल्या काही दिवसांपासून मादी बिबट्यच्या शोधात होते.

Chandrapur Leopard | चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातील मादी बिबट वनविभागाच्या जाळ्यात; तीन वर्षीय मुलीवर केला होता हल्ला
चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातील मादी बिबट वनविभागाच्या जाळ्यात
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 11:34 AM

चंद्रपूर : शहरालगत दुर्गापूर परिसरात हल्लेखोर मादी बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात (Forest Department Cage) अडकली आहे. दुर्गापूर- ऊर्जानगर (Durgapur-Urjanagar) परिसरात सातत्याने वाघ-बिबट हल्ल्यांमध्ये वाढ झाली होती. या भागात वनविभागाच्या वतीने अनेक ठिकाणी वन्यजीव कैद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी घराच्या अंगणात खेळत असलेली तीन वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. यानंतर स्थानिक संतप्त जमावाने वनविभागाच्या 10 अधिकारी-कर्मचाऱ्यांना (Officer-employee) रात्रभर कोंडले होते. या उद्रेकानंतर हल्लेखोर बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जारी झाले होते. यादरम्यान विविध पथकांद्वारे वाघ-बिबट्यचा शोध सुरू होता.

एक वाघ व 2 बिबटे जेरबंद

आज पहाटे सिनाळा- भटाळा गावालगत लावलेल्या एका पिंजर्‍यात ही मादी बिबट अडकली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर मादी बिबट्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दुर्गापूर- ऊर्जानगर परिसरातील वाघ बिबट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत एक वाघ व 2 बिबटे जेरबंद झाले आहेत. या घटनेमुळं दुर्गापूर परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, तरीही वन्यप्राण्यांचा त्रास संपला असा नाही. घातक वन्यप्राणी अडकले असले, तरी दुसरे प्राणी हल्ला करणार नाही, असं नाही. या वन्यप्राण्यांपासून सावधच राहावं लागेल.

अशी केली कारवाई

दुर्गापूर क्षेत्रातील वार्ड 1, 3 या परिसरात एका माती बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. तीन महिन्यांपासून धुमाकूळ मानवी जीवितास धोकादायक ठरले होते. या बिबट्यबाबत जनतेत प्रचंड आक्रोश होता. त्याला वरिष्ठांकडून गोळीबाराचे आदेश दिले होते. वनविभागाचे पथक गेल्या काही दिवसांपासून मादी बिबट्यच्या शोधात होते. 13 मे पहाटे बिबट अडकले. त्यामुळं त्याला जेरबंद करण्यात आले. अशी माहिती चंद्रपूर वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर यांनी दिली.