VIDEO : साताऱ्याच्या मांडवे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, पुरात वाहून एका महिलेचा मृत्यू

| Updated on: Jun 05, 2021 | 11:00 PM

सातारा जिल्ह्यात मांडवे गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला (Heavy rain in Mandve village of Satara)

VIDEO : साताऱ्याच्या मांडवे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, पुरात वाहून एका महिलेचा मृत्यू
साताऱ्याच्या मांडवे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस
Follow us on

सातारा : सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास सातारा, वाई, कोरेगाव, जावली, महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. यावेळी सातारा तालुक्यातील मांडवे येथे पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ओढ्या-नाल्याना पूर आला. या पुरात गावातील वृद्ध महिला वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. मधुमती सुधाकर माने (वय 65) असे पुरात वाहून गेलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे (Heavy rain in Mandve village of Satara).

घरांमध्येही पाणी शिरले

मुसळधार पावसात संबधित वृद्ध महिला घराकडे निघाली असताना अचानक ओढ्यावर पुराचे पाणी वाढल्याने त्या पाण्यात वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह गावानजीक ओढ्याच्या पात्रातील झुडुपात अडकलेल्या स्थितीत सापडला. ओढ्याच्या पुराचे पाणी लगतच्या असलेल्या विहिरीतही आल्याने विहिरी भरल्या तर काही घरांमध्येही पाणी शिरल्याने घरातील संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. मृत्यु झालेल्या वृध्द महिलेची बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे (Heavy rain in Mandve village of Satara).

महाराष्ट्रात मान्सून दाखल

मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. हवामान खात्यानं याची घोषणा केलीय. त्यामुळे शेतीत पेरणी करुन मान्सूनच्या पावसावर पिक फुलवण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग वाढणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यानं कोकणातील हर्रे परिसरात प्रवेश केलाय. सोलापूर मराठवाड्याच्या संलग्न भागात मान्सून दाखल झालाय

सांगलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे कारखान्याचे पत्रे उडाले, भटवाडी गावात अनेक घरे पडली

सांगलीत वादळी वाऱ्यामुळे कारखान्याचे पत्रे उडून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भटवाडी गावात अनेक घरे पडली. वादळी वाऱ्यामुळे संसार उपयोगी वस्तू आणि घरांचे नुकसान झाले आहे. तसेच काही लोक जखमी देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.