Weather update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज

IMD Weather Alert : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस वादळ वारा, विजांसह मध्यम पाऊसाचा अंदाज आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसतील.

Weather update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज
पाऊस
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 4:03 PM

Weather forecast today Mausam update मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. सांगली, पुणे, बीड, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  तसंच येत्या पाच दिवसात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस बरसण्याचा (Rain) अंदाज आहे.

सध्या राज्याच्या अनेक भागासह कोकणात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. येत्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असून, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागतज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. (Weather forecast today Mausam update IMD alert in next 5 days thunderstorm lightning and mod rains likley in Maharashtra)

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस वादळ वारा, विजांसह मध्यम पाऊसाचा अंदाज आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसतील असं के एस होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

होसाळीकर यांचं ट्विट

विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह येत्या तीन तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किमी इतका राहील. सांगली, पुणे, बीड, सोलापूरमध्ये येत्या तीन तासात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बाहेर पडताना काळजी घ्या, उंच झाडाखाली उभं राहू नका, असं के एस होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

मनमाड : मनमाड शहर परिसरात दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा मिळाला दिलासा. मान्सूनपूर्व पावसाने येवला शहर आणि तालुक्यातील गावांना चांगले झोडपले. अचानक दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी जवळपास तासभर लावली.

हिंगोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस

हिंगोली जिल्ह्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे भुईशेंग उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. शेतातील शेगांचं नुकसान झाले. जोरदार पावसामुळे अंतर मशागतीच्या कामांनाही व्यत्यय आला . वसमत, औंढा ,कळमनुरी या तालुक्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला.

नांदेडमधील बोथी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस

बोथी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. उमरी तालुक्यातील बोथी गावाला वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने गावातील अनेक घरांचे नुकसान झाले. त्याचबरोबर गावातील विद्युत पुरवठादेखील खंडित झालाय. तसेच गारपिटीमुळे बोथी गावातील काही गुरेदेखील जखमी झाले आहेत.

यंदा विदर्भाचा पारा चढलाच नाही!

विदर्भात दरवर्षी कडाक्याची उष्णता असते, पण यंदा विदर्भ तापलाच नाही. यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत विदर्भातील सरासरी तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत राहिलं. त्यामुळे विदर्भातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. दरवर्षी विदर्भात 47 तर कधी 48 अंश सेल्सिअस तापमान असते, या उन्हात जिवाची अक्षरशा लाही लाही होते. पण यंदा सरासरी तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत राहिलं.

मान्सून दोन दिवसात केरळमध्ये

भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र, मान्सूनवर यास चक्रिवादळाचा सकारत्मक परिणाम झाल्यानं यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजपूर्वी म्हणजेच 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल

महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?

सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल. त्याप्रमाणे 9-10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

VIDEO : संबंधित बातम्या 

Weather update : मान्सून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

(Weather forecast today Mausam update IMD alert in next 5 days thunderstorm lightning and mod rains likley in Maharashtra)

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.