AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

कोरोना संकटाच्या काळात आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मॉन्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. (Monsoon Rain Forecast 2021)

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज
किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्ष आहे. या कार्डवर शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्ज दिले जाते. तसेच शेतीसाठी कर्जे सुमारे 9 टक्के व्याज दराने उपलब्ध आहेत. परंतु केसीसीवर सरकार शेतकऱ्यांना दोन टक्के अनुदान देते आणि केसीसीच्या वेळेवर भरणा केल्यास 3 टक्के अतिरिक्त सूट दिली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांचा व्याजदर 4 टक्के आहे.
| Updated on: Apr 16, 2021 | 1:21 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मान्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे मान्सूनचा पाऊस पडतो. गेल्या तीन वर्षापासून तो सामान्य आहे. येणारा पावसाळाही त्याला अपवाद नसेल. 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस सामान्य मॉन्सून म्हणून गणला जातो. काही दिवसापुर्वी स्कायमेट ह्या दुसऱ्या हवामान संस्थेनेही मॉन्सून सामान्य असेल म्हणून जाहीर केलं आहे. त्यानंतर आता सरकारच्या हवामान विभागानेही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही गूड न्यूज दिली आहे. (Monsoon Rain Forecast 2021 Weather monsoon Rainfall India IMD India Meteorogical Department Average Mansoon)

हवामान विभागाने काय म्हटलं…?

यंदाच्या वर्षी देशातील अधिक भागांत सामान्य मान्सून म्हणजेच 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस पडेल. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मान्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या मे महिन्यात मॉन्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला जाईल.

हवामान विभागाची शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मॉन्सून संदर्भात वर्तवला मोठा अंदाज

एका रिपोर्टनुसार, भारतातले जवळपास 20 कोटी शेतकरी आपण लावलेल्या पिकासाठी पावसाची वाट पाहत असतात. याचा अर्थ असा की देशातील जवळपास 50 टक्के शेतीला अजूनही सिंचनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत किंवा त्या पोहोचलेल्या नाहीत. यामुळे कृषी उत्पादन भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये केवळ 14 टक्के वाटा आहे.

वास्तविक, कृषी क्षेत्र देशातील 65 कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध देते. भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे, म्हणजे जवळपास 50 टक्के लोकांना शेती व शेती आणि शेती उद्योगांमध्ये रोजगार मिळाला आहे.

अल निनो म्हणजे काय?

अल-निनोमुळे, पॅसिफिक महासागरामधील समुद्राचा पृष्ठभाग अधिक गरम होतो, ज्यामुळे वारा आणि वेग बदलण्याचा मार्ग बदलतो, ज्यामुळे हवामान चक्रांवर वाईट परिणाम होतो. हवामानातील वाईट बदलामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ आहे आणि बर्‍याच ठिकाणी पूरस्थिती उद्भवते. त्याचा परिणाम जगभर दिसून येतो.

अल निनोच्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वारंवार दुष्काळ पडतो, तर अमेरिकेत मुसळधार पाऊस पडतो. ज्या वर्षी अल निनो जोरात काम करतं, त्यावर्षी निश्चितच त्याचा परिणाम मॉन्सूनवर होतो.

(Monsoon Rain Forecast 2021 Weather monsoon Rainfall India IMD India Meteorogical Department Average Mansoon)

हे ही वाचा :

या औषधी वनस्पतीची लागवड करा आणि मिळवा तीन पट अधिक नफा, वर्षातून तीन ते चार वेळा येते पीक

केवड्याच्या लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत शेतकरी, जाणून घ्या कशी करायची याची शेती

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.