शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, राज्यासाठी रोलमॉडल ठरणारा प्रकल्प कोणता ते सांगितलं

| Updated on: May 05, 2023 | 4:31 PM

राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली आहे. शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होतोय. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, राज्यासाठी रोलमॉडल ठरणारा प्रकल्प कोणता ते सांगितलं
Follow us on

कुणाल जायकर, प्रतिनिधी, अहमदनगर : राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली आहे. शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होतोय. मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात बांधा – वापरा – हस्तांतरीत करा, तत्वावर जिल्हा पतिषदेची पहिली शाळा उभारण्यात आली. बीओटी तत्वामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचे रुपडे पालटलंय. राज्यात जिथे शक्य आहे तिथे बीओटी तत्वावर शाळा उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच दत्तक शाळा ही संकल्पना सुरू करणार असल्याचे दीपक केसरकर म्हणालेत.

तीन झेडपी शाळा बीओटी तत्त्वावर विकसित

राज्यातील जिल्हा परिषदेच्या बीओटी तत्वावरील शाळेचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते पार पडले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात आत्तापर्यंत तीन जिल्हा परिषद शाळा या बीओटी तत्वावर विकसित‌ झाल्यात. राज्यासाठी हा प्रकल्प रोलमॉडेल ठरणार असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हंटलंय.

हे सुद्धा वाचा

मोठा कार्यक्रम घेतोय. मुलांना चांगली शाळा देण्याचा प्रयत्न आहे. याचे उत्कृष्ट मॉडल राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात करून दाखवलं आहे. ज्या-ज्या ठिकाणी बीओटी तत्वावर अशा शाळा उभारता येतील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. दत्तक शाळा नावाची नवीन संकल्पना आणतोय. शाळांच्या विकासासाठी लागणारा निधीसुद्धा उपलब्ध होईल, असं आश्वासन दीपक केसरकर यांनी दिलं.

बदलीसंदर्भात नवीन धोरण राबवणार

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सातत्याने बदलीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आता एकाच ठिकाणी नोकरी करता येईल. यासाठी नवीन धोरण आणणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलंय. हे धोरण लागू झाल्यास नेहमी होणाऱ्या बदल्यांपासून शिक्षकांना मुक्ती मिळणार आहे.

तीन हजार शिक्षकांची पदे भरणार

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकांची काही ठिकाणी आवश्यकता आहे. अशा ठिकाणी शिक्षकांची पदे भरली जातील. लवकरच तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अशी माहितीही शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी दिली.