200 रुपये कमावणाऱ्या युवकाची सामाजिक बांधिलकी, लग्नामधील खर्च वाचवून अनाथ मुलांना 55 हजार दिले

संतोष कांडेलकर यांनी आपल्या स्वतःच्या विवाहाचा खर्च टाळून 55 हजाराची मदत अनाथ मुलांसाठी दिली आहे. Santosh Kandelkar

  • Updated On - 5:55 pm, Tue, 11 May 21 Edited By: Chetan Patil
200 रुपये कमावणाऱ्या युवकाची सामाजिक बांधिलकी, लग्नामधील खर्च वाचवून अनाथ मुलांना 55 हजार दिले
संतोष कांडेलकर यांनी अनाथ मुलांसाठी मदत केली

जळगाव: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. या संकटात माणुसकीची भावना अधिक बळकट होत असल्याचं दाखवून देणाऱ्या घटना आपल्या समोर येत असतात. मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा गावातील संतोष कांडेलकर या तरुणानं लग्नाचा खर्च टाळून 55 हजार 555 रुपये अनाथांसाठी रकाम करणाऱ्या संस्थेला दिले आहेत. संतोष कांडेलकर यांचं या कृतीबद्दल परिसरात अभिनंदन होतं आहे. (Jalgaon Muktainagar Santosh Kandelkar gave fifty five thousand rupees for orphans)

200 रुपये रोजंदारी पण मोठं दातृत्व

संतोष कांडेलकर रोजंदारीवर कामाला जातात. त्यांना रोजंदारीच्या कामाचे  दोनशे रुपये दिवसाला मिळतात. संतोष कांडेलकर यांनी आपल्या स्वतःच्या विवाहाचा खर्च टाळून 55 हजाराची मदत अनाथ मुलांसाठी दिली आहे. अनाथ गरीब होतकरू मुलांसाठी काम करणाऱ्या विश्वजीत फांउडेशनकडे धनादेश सुपूर्द केला आहे. या शिवाय आणखी 22 हजाराची रक्कम देखील त्यांनी समाजकार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील को-हाळा गावातील तरुण संतोष त्रंबक कांडेलकर 23 वर्षीय तरुणाचा विवाह मुक्ताईनगर येथील ममता वरखेडे सोबत झाला. मोजक्या लोकांमध्ये हा सोहळा नुकताच पार पडला संतोष हा स्वतः भूमिहीन असून बांधकाम मजूरी करणारा आहे.

आईच्या नावानं वाचनालय

संतोष कांडेलकर यानं गावात देखील त्याच्या आईच्या नावाने दोन वर्षापासून वाचनालय सुरू केले आहे. त्यानं नेहमी सामाजिक क्षेत्रात उपक्रम प्रेरणादायी तालुक्यात राबवले आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम याआधी त्याने राबवले आहेत.

इतरांसमोर आदर्श

संतोष कांडेलकर यांनी लग्नातील अनाठायी खर्च टाळून तो अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देऊन आदर्शवत काम केलं आहे. त्यांनी स्वतःच्या लग्नावर होणारा खर्च देखील या कोरोना काळात अनाथ मुलांसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.


संबंधित बातम्या:

जालन्यात आता लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट; राजेश टोपेंचे आदेश

शेतकऱ्यांना बांधावरच खते द्या, पीक कर्ज वाटपात सबब नको, मालाचे ब्रँडिंग करा; बळीराजासाठी टोपे धावले

(Jalgaon Muktainagar Santosh Kandelkar gave fifty five thousand rupees for orphans)