कोवळी पानगळ कधी थांबणार? नंदुरबारमध्ये एका महिन्यात 118 बालमृत्यू

राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी अनेक घोषणा होतात. हजारो कोटींचा निधी खर्च होत असतो मात्र आदिवासी दुर्गम भागात या योजना पोचतात का ? या भागातील आरोग्य यंत्रणा तितक्या सक्षम आहेत का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

कोवळी पानगळ कधी थांबणार? नंदुरबारमध्ये एका महिन्यात 118 बालमृत्यू
नंदुरबार


नंदुरबार: राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी अनेक घोषणा होतात. हजारो कोटींचा निधी खर्च होत असतो मात्र आदिवासी दुर्गम भागात या योजना पोचतात का ? या भागातील आरोग्य यंत्रणा तितक्या सक्षम आहेत का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण नंदुरबार जिल्ह्यात एकाच महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल 118 बालमृत्यू झाले आहेत. सरासरी विचार केल्यास तर दिवसाला चार बालकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे.

सप्टेंबर महिन्यात 118 बालमृत्यू

राज्यात सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील 118 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात 12 प्रकल्पात 2992 बालकांचा जन्म झाला आहे. त्यात 118 शून्य ते सहा वर्ष वयाच्या बालकांच्या मृत्यू झाला आहे .यात शून्य ते 28 दिवसाच्या 35 बालकांचा तर एक महिना ते एक वर्ष वयोगटातील 38, एक ते पाच वर्ष 20 उपजत बालकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या बालमृत्यूच्या दराचा दुप्पट हा दर आहे. दुर्गम भागातील अंगणवाड्या बंद असतात. पोषण आहार पोहोचत नाही. दुसरीकडे बालमृत्यूंचा संशोधन अहवाल सादर केला जात नसल्याचा आरोप समाजिक कार्यकर्त्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत यांनी केला आहे.

प्रशासनाकडून उपाययोजना सुरु

नंदुरबार जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. झालेल्या बालमृत्यूंच्या कारणांचा वस्तुस्थिती दर्शक रिपोर्ट तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात बालमृत्यू रोखण्यासाठी असलेल्या समितीची बैठक गेल्या पाच वर्षात झाली नव्हती. ती आता घेतली असून दर तीन महिन्यांना घेण्यात येणार असल्याची माहिती खुद्द जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे . जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यू या संदर्भात अनेक अहवाल येतात संख्या कागदावर कमी दिसते. मात्र, आदिवासी दुर्गम भागात चित्र वेगळे आसते ही परिस्थती बदलायची असेल प्रशासनाची आणि संबधित यंत्रणांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

इतर बातम्या:

‘फडणवीसांना या प्रकरणात ओढण्याचे परिणाम भोगावे लागणार’, चंद्रकांत पाटलांचा मलिकांना निर्वाणीचा इशारा

ITI प्रवेशाची मुदत वाढवली, यंदा विद्यार्थ्यांचा वाढता कल, कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांना प्राधान्य

Nandurbar 118 children died due to Malnutrition District Collector call meeting

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI