AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITI प्रवेशाची मुदत वाढवली, यंदा विद्यार्थ्यांचा वाढता कल, कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांना प्राधान्य

आयटीआयच्या प्रवेशाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता आयटीआयच्या उर्वरित जागांवर 18 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेण्यात येणार आहे. यापूर्वी आयटीआय प्रवेशासाठी 30 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

ITI प्रवेशाची मुदत वाढवली, यंदा विद्यार्थ्यांचा वाढता कल, कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांना प्राधान्य
आयटीआय
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 01, 2021 | 1:09 PM
Share

मुंबई: आयटीआयच्या प्रवेशाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता आयटीआयच्या उर्वरित जागांवर 18 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेण्यात येणार आहे. यापूर्वी आयटीआय प्रवेशासाठी 30 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आयटीआयच्या महाराष्ट्रातील 90 टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. महाराष्ट्रात यंदा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात यंदा आयटीआय प्रवेशांना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 83 हजार 744 विद्यार्थ्यांनी शासकीय आटीआय संस्थांमध्ये तर खासगी आयटीआयमध्ये 27784 प्रवेश घेतला आहे.

आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचं चित्र आहे. 2020 मध्ये आयटीआयला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेतला आहे.

महाराष्ट्राची सर्वाधिक प्रवेश क्षमता

राज्यात 417 शासकीय आयटीआय आहेत तर 550 खासगी आयटीआय आहेत. शासकीय आयटीआयची प्रवेश क्षमता एक लाख तर खासगी संस्थांची प्रवेश क्षमता 45 हजार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशांमध्ये वाढ झाली आहे.

आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर नोंदणी करुन अर्ज सादर करु शकतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थी महाआयटीआय या प्ले स्टोअरवरील अ‌ॅपचा देखील वापर करु शकतात.

इतर बातम्या:

दिवाळीपूर्वीचं फटाका फोडतोय, अजित पवार आणि पवारांच्या जावयांच्या कंपन्यात 1050 कोटी आले, किरीट सोमय्यांचा आरोप

IND vs NZ : या पराभवाचा खूप त्रास होईल; सेहवाग टीम इंडियावर बरसला, अझहरची कोचिंग स्टाफवर टीका

देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, ‘हे अत्यंत हास्यास्पद’

Maharashtra DVET extended Last date for ITI admissions to November 18 check details here

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट