
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून दगडफेक केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने उस्मानाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर बेशरमाची व इतर फुले फेकून गांधीगिरीने आंदोलन केले.

काश्मीर फाइल्स यावरून केजरीवाल यांनी वक्तव्य केले होते त्यावरून वाद झाला आहे, काश्मीर पंडित यांचे पुनर्वसन प्रकरणी भाजपने काही केले नाही, असे आरोप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केले.

लोकशाहीत तुम्ही आमच्यावर हल्ले केले तरी आम्ही त्याला गांधिगिरी स्टाइलने उत्तर देऊ, असं वक्तव्य आपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. उस्मानाबादेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बेशरमाची फुले मारत आंदोलन करण्यात आले.

आंदोलन झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे चिन्ह असलेल्या झाडूनेच साफसफाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला जी फुले वाहिली होती, ती रस्त्यावर पडली होती. आपच्या कार्यकर्त्यांनी झाडू मारून ही फुले एकत्र गोळा केली आणि ती नंतर उचलून घेतली.

तुम्ही केजरीवाल यांच्या घरावर दगड मारले,आम्ही मोदी प्रतिमेवर फुले मारली, असं म्हणत उस्मानाबादमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने गांधिगिरी स्टाइल आंदोलन करण्यात आले.