रामदास आठवलेंची महायुतीसाठी सेना-भाजपला साद, अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर एकत्र येण्याच आवाहन

मी दिलेला अडीच वर्षांचा जो फॉर्म्युला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवलेंची महायुतीसाठी सेना-भाजपला साद, अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर एकत्र येण्याच आवाहन
रामदास आठवले

सांगली: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा भाजप सोबत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली आहे. रामदास आठवलेंनी शिवसेनेला आणि भाजपला एकत्र येत पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची आवाहन केलंय. मी दिलेला अडीच वर्षांचा जो फॉर्म्युला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

शिवशक्ती-भीमशक्तीनं एकत्र यावं

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा भाजप सोबत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली आहे. शिवसेनेने अजून निर्णय बदलावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचं असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय एकत्र असले पाहिजेत, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले ते सांगली मध्ये बोलत होते.

अडीच वर्षांच्या कालावधीनंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं

अडीच वर्षाचा जो फॉर्मूला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं, असेही रामदास आठवले म्हणाले.

महाविकास आघाडीत अनेक वाद

महाविकास आघाडी सरकार मध्ये अनेक विषयावरती वाद आहेत. भ्रष्टाचारासंबंधीच्या अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये राहणे योग्य नाही, असेही आठवले म्हणाले

सरकार पडण्याची वाट पाहतोय

नारायण राणे म्हणतात, सरकार पडेल त्याप्रमाणे आम्ही देखील सरकार पडण्याची वाट पाहतोय. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एसटी कामगारांवर वर अन्याय होतोय. एसटी महामंडळाचा राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी जी समिती नेमलेय त्याचा अहवाल कदाचित विलीनीकरणासंबंधी येण्याची शक्यता आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

इतर बातम्या:

दोन महिन्यांपासून माझ्यावर, माझ्या नातवांवरही पाळत, हेरगिरी करणाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करणार: नवाब मलिक

माझा अनिल देशमुख करण्याचा केंद्रीय यंत्रणांचा डाव, अमित शहांकडे तक्रार करणार; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Ramdas Athawale said BJP and Shivsena should came together and accept formula of 2.5 years power sharing

Published On - 1:13 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI