अहमदनगरमध्ये साडे तीन लाखाचा बनावट खवा जप्त; मिठाई दुकानदार धास्तावले

गुजरातहून मोठ्या प्रमाणात बनावट खवा खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शहरात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

अहमदनगरमध्ये साडे तीन लाखाचा बनावट खवा जप्त; मिठाई दुकानदार धास्तावले
अहमदनगरमध्ये साडे तीन लाखाचा बनावट खवा जप्त
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 8:22 PM

अहमदनगर : अहमदनगरमध्ये साडे तीन लाख रुपये किमतीचा 1300 किलो बनावट खवा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गुजरातहून मोठ्या प्रमाणात बनावट खवा खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शहरात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बनावट खवा विकला जातो आणि या अशाच खव्यापासून मिठाई बनवली जाते. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केल्यामुळे नागरिक सतर्क झाले आहेत तर मिठाई दुकानदार चांगलेच धास्तावले आहेत. (Three and a half lakh fake khowa seized in Ahmednagar)

सध्या सर्वत्र दिवाळीची धूम सुरु आहे. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते. यासाठी मोठ्या प्रमाणात खव्याची मागणी असते. याचाच गैरफायदा घेत बनावट खवा बनवून विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात बनावट खवा हस्तगत करण्यास यश आले आहे. अन्न आणि औषध विभागाच्या कारवाईनंतर मिठाई दुकानदारांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. तसेच एवढ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आहे.

नकली सोन्याचे बिस्किटे विकणारा डोंबिवलीतील भामटा गजाआड

नकली बिस्किटे विकून नागरिकांना फसविणाऱ्या डोंबिवलीतील एका भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अश्विनीकुमार शुक्ला असे अटक केलेल्या भामट्याचे नाव असून त्याच्याकडून 9 नकली बिस्किटे हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपी अश्विनीकुमारने प्रवासी बनून एका रिक्षा चालकाला नकली सोन्याचे बिस्किट 50 हजार रुपयांना विकले. याप्रकरणी मानपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला अटक केले.

अश्विनीकुमार शुक्ला याने सोन्याची बिस्किटे विकण्याच्या नावाखाली आतापर्यंत अनेक लोकांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या रिक्षा चालकाने मानपाडा पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याची गठडी वळली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नाशिकमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठांना गंडा

एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालणाऱ्या हरियाणाच्या भामट्यांना नाशिक पोलिसांनी थेट धुळ्यात जावून इंगा दाखवत बेड्या ठोकल्या आहेत. शंकर आगलावे (वय 66) यांनी या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आगलावे हे 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास नाशिकरोड येथील दुर्गा गार्डनजवळील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा तिथे दोन भामटे आले. त्यांनी आगलावे यांच्या एटीएमचा पिन नंबर त्यांच्या अपरोक्ष चोरून पाहिला. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंगवून ठेवत त्यांच्या एटीएम कार्डचीही अदलाबदल केली. त्यातून जवळपास 32000 हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी आगलावे यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात 182/2021 भादवि 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Three and a half lakh fake khowa seized in Ahmednagar)

इतर बातम्या

धक्कादायकः सावत्र बापाकडून मुलीवर लैंगिक छळ, आईचीही सहमती, वर्षभरापासून धमक्या अन् दहशत, वैजापूरात खळबळ

कोल्हापुरात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन निर्घृण हत्या, 27 वर्षीय तरुणाला अटक