Ichalkaranji Crime : फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड

| Updated on: Jan 01, 2022 | 11:10 PM

तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, तत्कालीन डिवायएसपी गणेश बिरादार यांनी इचलकरंजी शहरातील सरकारच्या टोळीचा बीमोड केला होता व त्यांच्या सर्व आरोपींना गजाआड केले होते. हे दोन बंधुराज मात्र फरार होते.

Ichalkaranji Crime : फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
Follow us on

इचलकरंजी : विविध गुन्ह्यात 2019 पासून फरार असलेले इचलकरंजी शहरातील नगरसेवक संजय तेलनाडे यांना अडीच वर्षांनी पकडण्यास कोल्हापूर स्थानिक शाखेला यश आले आहे. तेलनाडे यांना मोक्काच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तेलनाडे यांच्यावर विविध प्रकारचे 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिली.

गेली वर्षापासून तेलनाडे बंधू फरार होते

इचलकरंजी शहरामध्ये गॅंग दहशत पसरवणे, हत्या, मारामारी, बनावट जागा खरेदी प्रकरणी 2019 पासून नगरसेवक संजय तेलनाडे व त्यांचा भाऊ सुनील तेलनाडे फरार होते. गेल्या अडीच वर्षापासून दोन्ही बंधुराज फरार होते. आज कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना नगरसेवक संजय तेलनाडे पुणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेलया माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संजय तेलनाडे यांना पुण्यातून अटक केली.

तेलनाडे बंधूंवर अनेक गुन्हे दाखल

संजय तेलनाडेंवर शहापूर, शिवाजीनगर, गावभाग आधी पोलिस ठाण्यांमध्ये हत्या, मारामारी, दहशत माजवणे, एसटी सरकार गॅंग बनवणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. गेल्या अडीच वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आज जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, तत्कालीन डिवायएसपी गणेश बिरादार यांनी इचलकरंजी शहरातील सरकारच्या टोळीचा बीमोड केला होता व त्यांच्या सर्व आरोपींना गजाआड केले होते. हे दोन बंधुराज मात्र फरार होते. सुमारे 18 टोळ्यांना मोक्का लावण्यात आला होता व 214 आरोपींना मोक्का कायद्यांतर्गत गजाआड केले होते. नगरसेवक संजय तेलनाडे यांना आज गजाआड केल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले लागले आहे. त्यामुळे शहरातील टोळ्या सक्रिय करणार्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Wanted accused corporator Sanjay Telnade arrested after two and a half years)