वाशिम जिल्ह्यात केवळ 9 टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस, डेल्टा प्लस’ला कसं रोखणार?

वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ 23 टक्केच असून त्यात केवळ 9 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला असल्याने डेल्टा प्लसला कसे रोखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाशिम जिल्ह्यात केवळ 9 टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस, डेल्टा प्लसला कसं रोखणार?
फोटो : पीटीआय, प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 6:57 PM

वाशिम: डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta Plus Variant) संभाव्य धोका टाळण्यासाठी व्यापक उपाय योजना आरोग्य विभाग करत आहे. परंतु, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ 23 टक्केच असून त्यात केवळ 9 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला असल्याने डेल्टा प्लसला कसे रोखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Washim only nine percent people take second jab corona vaccine administration have challenge of prevent corona and delta plus variant)

13 लाख लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट

कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 13 लाख 50 हजार नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाने 16 जानेवारीपासून वाटचाल सुरू केली आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असून आतापर्यंत 3 लाख 7 हजार 239 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

9 टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

2 लाख 64 हजार 354 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. म्हणजेच एकूण लक्ष्याच्या 30 टक्के नागरिकांनी लसींचा पहिला डोस घेतला आहे. तर केवळ 80 हजार 721 लोकांनी म्हणजेच केवळ 9 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

जिल्ह्यातील दुर्गम भागात लस घेण्यासाठी नागरिक अजूनही पुढे येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विविध मोहीम हाती घेतल्या आहेत. जाणीवजागृती करण्याचे काम राबविले जात आहे. मात्र, त्याला पाहिजे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे दिसून येते.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याचे आव्हान आरोग्य विभाग, पोलीस विभाग व सामाजिक कार्यकर्त्याकडून करण्यात येत आहे.

वाशिममध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध

वाशिम जिल्ह्याला डेल्टा प्लस या विषाणूचा धोका लक्षात घेता प्रशासनाने 28 जून पासून लेव्हल तीनची नियमावली लागू केली आहे. त्यानुसार संपूर्ण बाजारपेठ सोमवार ते शुक्रवार पर्यंत 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात आली होती. तर शनिवार व रविवार असा दोन दिवस विकेंड लॉकडाउन लावण्यात आला असून यात अत्यावश्यक वगळता सर्वच दुकाने बंद असणार आहेत.

इतर बातम्या:

ममता बॅनर्जींशी जुळवून घेण्यासाठी चौधरींना लोकसभेतील नेते पदावरून हटवणार?; काँग्रेसच्या हालचाली सुरू

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; ज्येष्ठ नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती बिघडली; लोहिया रुग्णालयात दाखल

(Washim only nine percent people take second jab corona vaccine administration have challenge of prevent corona and delta plus variant)