ममता बॅनर्जींशी जुळवून घेण्यासाठी चौधरींना लोकसभेतील नेते पदावरून हटवणार?; काँग्रेसच्या हालचाली सुरू

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन आठवड्यापूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पक्षात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. (adhir ranjan Chowdhury)

ममता बॅनर्जींशी जुळवून घेण्यासाठी चौधरींना लोकसभेतील नेते पदावरून हटवणार?; काँग्रेसच्या हालचाली सुरू
adhir ranjan Chowdhury
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 4:07 PM

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन आठवड्यापूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पक्षात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी या पक्षाचे बडे नेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेच्या नेतेपदावरून हटवण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी लोकसभेच्या नेतेपदी अन्य नेत्याची वर्णी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी काँग्रेसने चौधरी यांना बळीचा बकरा बनविण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. (Congress president Sonia Gandhi likely to replace adhir ranjan Chowdhury as Lok Sabha leader)

पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसने डाव्यांसोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासोबत अब्बास सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाही होता. या निवडणुकीत काँग्रेसने ममता बॅनर्जींवर एका शब्दानेही टीका केली नव्हती. काँग्रेसचा टीकेचा सर्व रोख भाजपकडेच होता.

तृणमूलवरील टीका भोवली?

ममता बॅनर्जी यांच्याशी जुळवून घेण्यासाठी अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेच्या नेतेपदावरून हटवण्यात येणार आहे. चौधरी हे बरहामपूरचे खासदार आहेत. मात्र, त्यांनी सातत्याने तृणमूलवर टीका केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि चौधरी यांचं पटत नाही. ममता बॅनर्जी यांच्यासोबत भविष्यात आघाडी करायची असेल तर चौधरी यांना दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच काँग्रेसने या हालचाली सुरू केल्या असल्याचं सांगितलं जात आहे.

थरूर, तिवारींची नावं चर्चेत

दरम्यान, चौधरी यांच्या जागेवर लोकसभेच्या नेतेपदी कुणाला बसवायचं याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही. तिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरुर आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनिष तिवारी यांच्याकडे ही सूत्रे दिली जाऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. लोकसभेतील नेतेपद राहुल गांधी यांच्याकडे देण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. थरूर किंवा तिवारी यांचीच नियुक्ती या पदासाठी होऊ शकते, असंही सूत्रांनी सांगितलं.

राज्यपालांना हटवण्याच्या हालचाली

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना परत पाठवण्यासाठी टीएमसी आणि काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. टीएमसी, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून राज्यपालांना परत बोलावण्यासाठी राष्ट्रपतींना पत्रं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Congress president Sonia Gandhi likely to replace adhir ranjan Chowdhury as Lok Sabha leader)

संबंधित बातम्या:

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती बिघडली; लोहिया रुग्णालयात दाखल

ओवैसी म्हणतात, योगींना मुख्यमंत्री नाही होऊ देणार, आदित्यनाथांनी चॅलेंज स्वीकारलं, यूपीचा फड पेटला

UP जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमळ फुललं, 75 पैकी 67 जागांवर भाजप, उपमुख्यमंत्री म्हणाले, SP साफ, BJP टॉप!

(Congress president Sonia Gandhi likely to replace adhir ranjan Chowdhury as Lok Sabha leader)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.