VIDEO | ‘पंढरीच्या वाळवंटात’, कलेतून विठूरायाचे भावविश्व उलगडणारा अवलिया

पनवेलमधील एक चित्रकार प्रकाश पाटील यांनी यंदाच्या आषाढी वारीवर वाळू कलेतून प्रकाश टाकला आहे. त्यांच्या या चित्रकलेतून विठूरायाचे भावविश्व उलगडले आहे.

VIDEO | 'पंढरीच्या वाळवंटात', कलेतून विठूरायाचे भावविश्व उलगडणारा अवलिया
Pandhapur Vitthal Rukmini temple


पनवेल : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राचा अध्यात्मिक वैभव असलेला आषाढी पालखी सोहळा आणि यात्रा रद्द झाली आहे. यामुळे लाखो भाविक वारकऱ्यांना या पालखी सोहळ्याची रुखरुख लागून राहिली आहे. पनवेलमधील एक चित्रकार प्रकाश पाटील यांनी यंदाच्या आषाढी वारीवर वाळू कलेतून प्रकाश टाकला आहे. त्यांच्या या चित्रकलेतून विठूरायाचे भावविश्व उलगडले आहे. (Panvel painting artist publish Pandhapur Vitthal Rukmini temple painting book)

प्रकाश पाटील यांनी पंढरीच्या वाळवंटात हा संग्रह आज विठ्ठल चरणी अर्पण केला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर कोरोना काळात असलेली संपूर्ण नकारात्मकता दुर होईल आणि एक वेगळीच वारी त्यांनी पोहच केली असल्याच्या भावना निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी व्यक्त केली आहे.

वाळूतून साकारलेला चित्र ग्रंथ विठ्ठल चरणी अर्पण

प्रकाश पाटील हे देखील विठ्ठलाचे निस्सिम भक्त आहेत. त्यांनी वाळू कलेतून विठुरायाचे भावविश्व उलगडून दाखवले आहे. पाटील यांनी वाळूतून विठुरायाची आणि पालखी सोहळ्यातील विविध प्रसंग आणि चित्रे रेखाटले आहेत. वाळूतून साकारलेला चित्र ग्रंथ ही तयार केला आहे. हाच ग्रंथ त्यानी श्री विठ्ठल चरणी अर्पण केला आहे.

विठुरायाची विविध रूपे उलगडण्याचा प्रयत्न

कोरोनामुळे सध्या पेंटिंग व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. अशावेळी पाटील यांना आषाढी पालखी सोहळा आणि आषाढी यात्रेत संदर्भात वाळूतून विठुरायाची विविध रूपे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वाळू चित्रकलेतून विठुरायाच्या भक्तांना घरबसल्या दर्शन मिळाले आहे.

पाहा व्हिडीओ :

(Panvel painting artist publish Pandhapur Vitthal Rukmini temple painting book)

संबंधित बातम्या : 

जरंडेश्वर प्रकरणी ईडीची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला नोटीस आली का? बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी नेमकं काय सांगितलं?

परभणीत आभाळ कोसळलं, 233 मेंढ्या वाहून गेल्या, 24 तासात 232 MM पावसाची नोंद

VIDEO: चिमुकलीचा घरासाठी थेट बच्चू कडू यांना फोन, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI