VIDEO: चिमुकलीचा घरासाठी थेट बच्चू कडू यांना फोन, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

VIDEO: चिमुकलीचा घरासाठी थेट बच्चू कडू यांना फोन, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

सोलापूर येथील एक चिमुकली जी दिव्यांग आहे, तिने घराच्या मागणीसाठी थेट आमदार बच्चू कडू यांना फोन लावला. तेव्हा बच्चू कडू हे प्रवासात होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 13, 2021 | 2:16 AM

सोलापूर : सोलापूर येथील एक चिमुकली जी दिव्यांग आहे, तिने घराच्या मागणीसाठी थेट आमदार बच्चू कडू यांना फोन लावला. तेव्हा बच्चू कडू हे प्रवासात होते. मात्र या चिमुकलीसोबत त्यांनी आपुलकीने संवाद साधत, तुला मदत पोहचेल अशी तिला ग्वाही दिली. फोनवरील या संभाषणाचा व्हिडिओ बच्चू कडू यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. यानंतर राज्यात याची सर्वत्र चर्चा सुरू आहे .

बच्चू कडू यांनी फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करताना काही मजकूर देखील टाकला आहे. ज्यामध्ये ते म्हणातात, “सहज संवाद होत राहो, सामान्यांचा आम्ही सेवक व्हावे जनसामान्यांचा. गरजूमध्ये प्रचंड विश्वास निर्माण होऊ दे, सेवा घडू दे सेवा घडू दे विठ्ठला. हेच मागणे हीच प्रार्थना. मोबाईलमुळे जग खूप जवळ आले आहे. प्रत्यक्षात आपण एकमेकांपासून कितीही अंतरावर असलो तर मोबाईलमुळे हे अंतर कमी होऊ गेले आहे. आज नैना नागनाथ झोकाळ या चिमुकलीचा फोन आला. ती दिव्यांग आहे. मोबाईलमुळे ती तिच्या समस्या माझ्यापर्यंत पोहचवू शकली. लवकरच तिला आमच्यातर्फे सर्वोतोपरी मदत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.”

“गरजुंनी आपल्या समस्या टेक्स्ट मेसेज स्वरूपात पाठवा”

“परंतु नैनासारखे अनेक गरजू समाजात आहेत. केवळ समोर भेटूनच आपली समस्या सांगायची किंवा फोनवरच सांगायची आहे, या हट्टापायी अशा अनेक गरजूंच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. यासाठी आमची सर्व गरजूंना विनंती आहे, की आपण आपल्या समस्या टेक्स्ट मेसेज स्वरूपात पाठवाव्यात, जेणेकरून त्या आमच्या पर्यंत पोहोचतील आणि आम्हाला त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता येतील,” असंही बच्चू कडू यांनी आवाहन केलंय.

हेही वाचा :

VIDEO: रुग्णांचं निकृष्ट जेवण पाहून बच्चू कडूंचं रौद्ररुप, सर्वांसमोर आचाऱ्याच्या कानशिलात लगावली

लाल दिव्याची गाडी, पण हक्काचं घर नाही; बच्चू कडूंचं खरं नाव माहीत आहे का?

VIDEO | बच्चू कडूंचे तुफान षटकार, समर्थकांचा जल्लोष

व्हिडीओ पाहा :

Video of Small handicap girl call MLA Bachchu Kadu for demand of home

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें