VIDEO | बच्चू कडूंचे तुफान षटकार, समर्थकांचा जल्लोष

राजकीय मैदान गाजवणाऱ्या महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांची सध्या क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी पाहायला मिळत आहे. (Bacchu Kadu Cricket Achalpur)

VIDEO | बच्चू कडूंचे तुफान षटकार, समर्थकांचा जल्लोष
बच्चू कडू यांनी अचलपूरमध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले

अमरावती : शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना राजकीय मैदानात तुफान फटकेबाजी करताना आपण पाहिलं आहे. मात्र प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानात षटकार ठोकताना पाहण्याचा योग बच्चूभाऊंच्या समर्थकांना आला. अमरावतीच्या पीचवर बच्चू कडूंनी बॅटिंग केली. (Bacchu Kadu Cricket Achalpur)

अचलपूर येथील प्लास्टिक बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांनी केले. त्यानंतर समर्थकांच्या आग्रहामुळे कडूंनी बॅट हाती धरली आणि जोरदार फटके लगावले. बच्चू कडू यांच्या फटकारांनंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. राजकीय मैदान गाजवणाऱ्या महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांची सध्या क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ :

राजकारणातील दिग्गजांची फटकेबाजी

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने आमदार चषक स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी कृषी मंत्री दादा भुसे, महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. तिघांनीही मैदानात चांगलीच फटकेबाजी केली. विशेष म्हणजे खुद्द आमदार विक्रम सावंत यांनीच तिघांना गोलंदाजी केली.

नाणेफेक करुन नितीन राऊत मैदानात

सुदर्शन प्रिमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप टूर्नामेंट 2021 चे नागपुरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. नितीन राऊत यांनी प्रमुख उपस्थिती लावत स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला. नितीन राऊत यांनी नाणेफेक केली. त्यानंतर स्वतः हातात बॅट घेऊन राऊत खेळपट्टीवर उभे राहिले आणि त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

हसन मुश्रीफ यांची तडाखेबाज फलंदाजी

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही काही दिवसांपूर्वी क्रिकेटचं मैदानही गाजवलं. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांनी बॅटिंग करताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. मुश्रीफ यांची तडाखेबाज फलंदाजी पाहून समर्थकही अवाक झाले. (Bacchu Kadu Cricket Achalpur)

मिलिंद नार्वेकरांची फटकेबाजी

मुंबईतील विक्रोळी पार्कसाईटमध्ये ‘महाविकास आघाडी चषक’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थिती लावली होती. कै. हिंदुराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत नार्वेकरांनी तूफान फटकेबाजी केली

संबंधित बातम्या :

माझं कार्यालय सर्वांचं दुःख दूर करणार, वीरमातेच्या हस्ते बच्चू कडूंच्या मंत्रालय दालनाचे उद्घाटन

VIDEO | आमदाराची बॉलिंग, तिघा मंत्र्यांची बॅटिंग, सांगलीच्या पीचवर शिवसेना-काँग्रेसच्या दिग्गजांची फटकेबाजी

VIDEO | महाविकास आघाडी चषकात मिलिंद नार्वेकरांची तुफान फटकेबाजी

VIDEO | राजकीय मैदानात तुफान बॅटिंग, हसन मुश्रीफ यांची क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी

VIDEO | राजकीय मैदानात तुफान बॅटिंग, नितीन राऊत यांची क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी

(Bacchu Kadu Cricket Achalpur)

Published On - 8:01 am, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI