VIDEO | राजकीय मैदानात तुफान बॅटिंग, हसन मुश्रीफ यांची क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी

VIDEO | राजकीय मैदानात तुफान बॅटिंग, हसन मुश्रीफ यांची क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी

कागल बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या मैदानावर हसन मुश्रीफ यांची बॅटिंग पाहण्याचा योग समर्थकांना आला

अनिश बेंद्रे

|

Dec 21, 2020 | 10:10 AM

कोल्हापूर : राजकीय मैदानात तुफान ‘बोलं’दाजीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी क्रिकेटचं मैदानही गाजवलं. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांनी बॅटिंग करताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. मुश्रीफ यांची तडाखेबाज फलंदाजी पाहून समर्थकही अवाक झाले. (Hasan Mushrif Batting Video in Kolhapur)

कागल बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या मैदानावर हसन मुश्रीफ यांची बॅटिंग पाहण्याचा योग समर्थकांना आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे यांच्या वाढदिवसानिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. समर्थकांचा आग्रह आणि क्रिकेट खेळण्याची हौस, यामुळे मुश्रीफ यांनाही फलंदाजी करण्याचा मोह आवरता आला नाही.

हसन मुश्रीफ बॅटिंगसाठी उतरले, तेव्हा त्यांनी चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. मुश्रीफ बॅटिंग करतानाचा व्हिडीओ चाहत्यांनी लगेच कॅमेरात कैद केला. त्यानंतर अल्पावधीतच तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. आपल्या लाडक्या नेत्याचं न पाहिलेलं रुप पाहून त्यांचे समर्थकही चकित झाले आहेत.

कोण आहेत हसन मुश्रीफ?

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते
महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री
मुश्रीफ हे कोल्हापूरमधील कागल मतदारसंघातून आमदार
आघाडी सरकारच्या काळात कामगार मंत्रालयाची धुरा
66 वर्षीय हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय

पाहा व्हिडीओ 

(Hasan Mushrif Batting Video in Kolhapur)

चंद्रकांत पाटलांसोबत राजकीय ‘बोलं’दाजी

काँग्रेस-राष्ट्रवादीने आमचा भाऊ पळवला, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सत्तेच्या स्थापनेनंतर केली होती. याला मुश्रीफ यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं होतं. “भावाला वाटणी दिली नाही. त्याला मालमत्ता दिली नाही. तर तो वेगळा राहणारच. त्यालाही आता समजायला लागले आहे. तोही आता मोठा झाला आहे. त्याला तुम्ही संपत्तीत वाटा देत नाही. तर तो त्याची वेगळी चूल मांडणारच ना. यात कुठे बिघडलं. आता तर तो मालकच झाला आहे” असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांनी पाटलांना लगावला होता.

“साधेभोळेपणा आणि विरोधकांचा काटा काढायचा, चंद्रकांतदादांचे दोन स्वभाव”

चंद्रकांतदादांनी मला खूप त्रास दिला. सत्तेत असताना त्यांनी माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. ईडीच्या धाडी टाकल्या. कोल्हापूर जिल्हा बँकप्रकरणीही त्रास दिला. ते लोकांना मदत करतात. त्यांचे दोन स्वभाव आहेत. एक साधाभोळा स्वभाव आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढण्याचा, असा आरोप मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे, अशी खोचक टिप्पणी हसन मुश्रीफ यांनी केली होती.

संबंधित बातम्या :

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी; हसन मुश्रीफांचा सणसणीत टोला

साधाभोळा स्वभाव आणि विरोधकांचा काटा काढायचा, चंद्रकांतदादांचे दोन स्वभाव; मुश्रीफांची टीका

(Hasan Mushrif Batting Video in Kolhapur)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें