AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं कार्यालय सर्वांचं दुःख दूर करणार, वीरमातेच्या हस्ते बच्चू कडूंच्या मंत्रालय दालनाचे उद्घाटन

वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालय दालनाचे उद्घाटन करण्यात आले (Bacchu Kadu Anuradha Gore)

माझं कार्यालय सर्वांचं दुःख दूर करणार, वीरमातेच्या हस्ते बच्चू कडूंच्या मंत्रालय दालनाचे उद्घाटन
| Updated on: Feb 03, 2021 | 1:22 PM
Share

मुंबई : वीरमाता अनुराधा गोरे (Anuradha Gore) यांच्या हस्ते शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या मंत्रालय दालनाचे उद्घाटन करण्यात आले. अनुराधा गोरे या 1995 मध्ये भारत पाक युद्धात शहीद झालेले जवान कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता आहेत. माझं कार्यालय सर्वांचं दुःख दूर करणार, अशा भावना यावेळी बच्चू कडूंनी व्यक्त केल्या. (Bacchu Kadu Mantralaya office inauguration by Anuradha Gore)

“माझे मंत्रालय सर्वांचे दुःख दूर करणार”

“माझे मंत्रालयातील कार्यालय हे अतिशय बोलकं, चालतं, दुःखहरण करणारं, प्रेरणा देणारं कार्यालय म्हणून निर्माण करण्याचे प्रयत्न आपण करुयात. तशा स्वरुपात कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी काम करतील” अशा भावना यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केल्या.मंत्रालय दालनात शेतकरी, शोषित आणि शहिदांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचे कपाट तयार करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी बच्चू कडू यांनी दिली.

अनुराधा गोरे कोण आहेत?

अनुराधा गोरे या मुंबईत पार्ले टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहे. त्यांचे सुपुत्र कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांना 26 सप्टेंबर 1995 रोजी वयाच्या 26 व्या वर्षी वीरमरण आले. भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात ते शहीद झाले.

मुलाच्या निधनानंतर अनुराधा गोरे यांनी अनेक शाळांतून व्याख्याने देऊन तरुणांना भारतीय सैन्याची, सैनिकांची आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारी व्याख्याने देण्यास आणि वर्तमानपत्रांत लेख लिहिण्यास सुरुवाती केली. गोरे यांची बहुतेक पुस्तके सैन्य आणि सैनिक या विषयांशी संबंधित आहेत. अनुराधा गोरे जानेवारी 2017 मध्ये बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या. त्या मूळच्या सातार्‍याच्या आहेत.

संबंधित बातम्या :

मंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या, आता बच्चू कडू म्हणतात, मंत्रिपद पणाला लावणार

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वृद्धांना घातलं अभ्यंगस्नान, पुरणपोळीचं जेवण देत दिवाळी केली खास!

(Bacchu Kadu Mantralaya office inauguration by Anuradha Gore)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.