Parbhani Corona Update | परभणीला कोरोनाचा विळखा, कधी किती रुग्णांची नोंद?

परभणीत कोरोना विषाणचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. (Parbhani Corona Update)

Parbhani Corona Update | परभणीला कोरोनाचा विळखा, कधी किती रुग्णांची नोंद?
coronavirus
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 3:39 PM

परभणी : परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध केले आहेत. यानुसार मुंबई-पुण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या खासगी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच औरंगाबादहून नांदेड येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी वाहतुकींवर 23 मार्चपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत.  परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. (Parbhani Corona Update)

परभणीत कोरोना विषाणचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. राज्य सरकारच्या मिशन बिगेन अंतर्गत सर्व जिल्हयांच्या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या ठिकाणाहून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे परभणीत कोरोनाचा संसर्गात वाढ होताना दिसत आहे.

परभणीतील कोरोनाची सद्यस्थिती काय?

परभणी शहरासह जिल्ह्यात काल तब्बल 147 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  सद्यस्थितीत परभणीत 451 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. परभणी जिल्ह्यात 345 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच परभणीत 9 हजार 420 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. तर 8 हजार 624 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

परभणीत कधी किती रुग्णांची नोंद?

तारीख – रुग्ण 

  • 09 मार्च – 59
  • 10 मार्च – 79
  • 11 मार्च – 82
  • 12 मार्च – 42
  • 13 मार्च – 43
  • 14 मार्च – 87
  • 15 मार्च – 147

परभणीतील प्रतिबंधात्मक उपाययोजना

1) जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 2) 10 वी 12 वी वगळता सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. 3) विदर्भातील 11 जिल्ह्यातील नागरिकांना परभणीत आणि परभणीतून विदर्भात जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. 4) मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या खाजगी बसेसची वाहतूक बंद, 5) औरंगाबाद व नांदेड येथे येणाऱ्या-जाणाऱ्या एसटी प्रवासी वाहतुकीवरही 23 मार्चपर्यंत निर्बंध 6)धार्मिक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता पुढील आदेशा पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत. 7)केवळ धार्मिक विधी साठी पुजाऱ्याने परवानगी देण्यात आली आहे. 8) शहरात rtpcr टेस्ट साठी 4 केंद्र सुरू करण्यात आली आहेत 9) rtpcr टेस्ट न करणाऱ्या व्यापारी आणि दुकानदार यांना दुकान उघडता येणार नाहीत

परभणीत दोन दिवस संचारबंदी 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने परभणी जिल्ह्यातील नागरी भागात दोन दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका हद्द, इतर 5 किमी परिसरात आणि नगर परिषदेच्या हद्दीत 3 किमी परिसरात ही संचारबंदी लावण्यात आली आहे. पण असं असतानाही नागरिकांना मात्र कोरोनाची भीती दिसत नाही. परभणीत अनेक जण विनाकारण लोक घराबाहेर पडत आहेत.

जिंतूर शहरात या रिकाम्या लोकांना धडा शिकविण्यासाठी स्वतः जिंतूरचे तहसीलदार सखाराम मांडवगडे हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरल्याच बघायला मिळत आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना ते हलक्या हाताने काठ्यांचा प्रसाद ही देत होते. अशापद्धतीने रस्त्यावर अधिकारीच उतरल्याने नागरिकांची ही पळापळ होत होती. तर तहसीलदार ही मोक्कारांना धडा शिकविण्यासाठी त्यांचा पाठलाग करुन सक्तीने नियम पाळण्यास भाग पाडत होते. तहसीलदारांचं हे सिंगम रूप बघून अनेकांची पळापळ होत होती. (Parbhani Corona Update)

संबंधित बातम्या : 

Corona Update | कोरोना काळातही लग्नाची धामधूम, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोना ‘जावयां’साठी पर्वणी, बीडमधील गाढवावरुन मिरवणुकीची परंपरा खंडित होण्याची चिन्हं

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.