AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना ‘जावयां’साठी पर्वणी, बीडमधील गाढवावरुन मिरवणुकीची परंपरा खंडित होण्याची चिन्हं

दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावर बसवून जावयाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. (Beed Son in law Donkey Procession )

कोरोना 'जावयां'साठी पर्वणी, बीडमधील गाढवावरुन मिरवणुकीची परंपरा खंडित होण्याची चिन्हं
| Updated on: Mar 16, 2021 | 1:47 PM
Share

बीड : कोरोनाने सगळ्यांनाच जेरीस आणले आहे, परंतु जावई मंडळींसाठी तो पर्वणी ठरु लागला आहे. वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल मात्र बीडमधील जावयांचा जीव खरंच भांड्यात पडला आहे. कारण धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढण्याची प्रथा खंडित होण्याची चिन्हं आहेत. (Beed Vida Village Son in law Donkey Procession tradition on Holi Dhuliwandan to be cancel)

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथील जावयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावर बसवून जावयाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या परंपरेला जवळपास 80 हून अधिक वर्षांचा इतिहास आहे.

जमावबंदीच्या आदेशाचा फटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडसह अनेक जिल्ह्यात यंदा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. होळी, धुलिवंदन यासारखे सण साजरे करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे गदर्भ सवारीची ही प्रथाही खंडित होण्याची शक्यता आहे.

गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची नामुष्की टाळण्यासाठी जावयांना लपून बसण्याची कसरत करावी लागते. मात्र ही परंपरा या वर्षी पाळली जाण्याची शक्यता कमी असल्याने विड्याच्या जावयांना लपून बसण्याची गरज पडणार नाही.

काय आहे परंपरा?

साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलिवंदनाच्या दोन दिवस आधीपासूनच जावईबापूंना शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकंही नेमली जातात. धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसवण्याची तयारी करण्यात येते.

नवीन कपड्याचा आहेर

जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत काढण्यात येते. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभाग घेते. तब्बल पाच तास मिरवणूक चालल्यानंतर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर दिला जातो.

एकदा गाढवावर बसवण्यात आलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसवण्यात येत नाही. सासरच्या मंडळीकडून अपेक्षा करत रुसवा फुगवा करणारे जावई धुलिवंदनाला गपचूप गाढवावर बसतात. धुलिवंदनाच्या या आनंदात गावकऱ्यांसह ते सुद्धा सहभागी होतात. थट्टेतून जावयाचा सन्मान करणारे विडा हे गाव राज्यातच नाही तर संपूर्ण देशातले एकमेव आहे.

संबंधित बातम्या :

जावयाची गाढवावरुन जंगी मिरवणूक काढण्याची प्रथा, लपून बसलेल्या जावयांना शोधण्यासाठी पथकं

(Beed Vida Village Son in law Donkey Procession tradition on Holi Dhuliwandan to be cancel)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.