जळगावच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण एकीकडे देशात गाजत असताना जळगावातील प्रकरण देखील चर्चेत आले होते. या प्रकरणातील आरोपींना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गाडी चालवणारे नशेत होते की नाही याचा अद्याप निष्कर्श येऊ शकलेला नाही. कारण त्यांचा ब्लड रिपोर्ट अजून आलेला नाही.

जळगावच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 6:37 PM

जळगावच्या रामदेववाडी अपघात प्रकरणातील दोन्ही आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जळगावच्या रामदेववाडी येथील अपघातात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील महिलेसह तीन मुलांचा मृत्यू झाला होता. अपघाताला कारणीभूत आरोपी अर्णव कौल आणि अखिलेश पवार या दोघांना आज जिल्हा न्यायालयात करण्यात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश वसीम देशमुख यांच्या न्यायालयासमोर आज कामकाज झालं. सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांच्यातर्फे जिल्हा न्यायालयात युक्तिवाद झाला. दोघांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातील घटनेनंतर आले चर्चेत

जळगावच्या रामदेव वाडी येथील अपघाताचे पुणे येथील येथील हिट अँड रन प्रकरणाशी करण्यात तुलना करण्यात आली होती. युक्तिवाद दरम्यान आरोपीचे वकील यांनी सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाचाही संदर्भ दिला. या प्रकरणात नव्याने आता काही बाबी समोर आले आहेत. यात कारमध्ये चार जण असल्याची माहिती समोर आली असून तिसरा जो आरोपी आहे त्याचं नाव निष्पन्न झालं आहे. ध्रुव सोनवणे असं या तिसऱ्या क्रमांकाच्या आरोपीचे नाव आहे.

कोण आहेत आरोपी

तीन दिवसाचे पोलीस कोठडीत तिसरा क्रमांकाचे आरोपीचा शोध तसेच चौथा आरोपी कोण त्याबाबतची माहिती याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही त्यामुळे तो अहवाल आल्यानंतर त्यात काय समोर येतं ते पहाणे महत्त्वाचे असेल. रक्ताच्या नमुनांचा अहवाल आल्यानंतरच आरोपी त्यादिवशी नशेत होते की नव्हते या गोष्टीचा उलगडा होईल. त्यामुळे या सर्व बाबींकडे आता लक्ष लागले आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरण चर्चेत आल्यानंतर हे प्रकरण देखील चर्चेत आलं होतं. या प्रकरणातील आरोपी हे बिल्डर आणि एका नेताचा मुलगा आहे. गाडीने महिलेसह तिच्यासोबत असलेल्या ३ मुलांना उडवलं होतं. ज्यामध्ये या चौघांचा मृत्यू झाला होता. १७ दिवस उलटूनही आरोपींचे ब्लड रिपोर्ट आलेले नाहीत. येथील स्थानिक नेतेही या प्रकरणावर बोलताना दिसत नाहीयेत.

राणी चव्हाण या आशा स्वयंसेविका आपली इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत होत्या. दुचाकीवर त्यांच्यासोबत ७ आणि ४ वर्षांची दोन मुलं आणि १६ वर्षाचा त्यांचा भाचा होता. जळगावच्या रामवाडीजवळ एका कारनं दुचाकीला धडक दिली. यात राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्यासोबतच्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला.

Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.