बिन पगारी आणि फुल्ल अधिकारी….अशी गत कुणाची झाली ?

| Updated on: Sep 07, 2022 | 3:35 PM

सद्रक्षणाय खलनिग्रणाय असं ब्रीद वाक्य असलेल्या पोलीस दलाला कायदा सुवस्था सुस्थित राखण्यात खांद्याला खांदा लावून गावाखेड्यात काम करणारे पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहे.

बिन पगारी आणि फुल्ल अधिकारी....अशी गत कुणाची झाली ?
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: tv9
Follow us on

नाशिक – सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीद वाक्य असलेल्या पोलीस दलाला कायदा सुव्यवस्था सुस्थित राखण्यात खांद्याला खांदा लावून गावाखेड्यात काम करणारे पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहे. सहा महिने उलटले तरी शासनाकडून त्यांना मिळणारे मानधन त्यांच्या बँक खात्यावर आलेले नाहीत. राज्याची पोलीस पाटील संघटना याबाबत राज्यातील पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहे.

  1. गावखेड्यात छोटे-मोठे तंटे, हाणामाऱ्या आणि इतर वादविवाद गावातच मिटवण्यासाठी पोलीस पाटील हे महत्वाची भूमिका बजावत असतात.
  2. आरक्षणाच्या नव्या धोरणानुसार पोलीस पाटील हे पद देण्यात आले आहे.
  3. 2012 पासून पोलीस पाटलांना प्रवास भत्ताही देण्यात आलेला नसून मानधन वाढवून देण्याची मागणी पोलीस पाटील संघटनेनं केली आहे.
  4. सध्या पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये इतके मानधन असून 24 तास कर्त्यव्य बजावण्यासाठी सतर्क राहावे लागत आहे.
  5. तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना गावांचं वाटप केलेलं असतं. त्यात पोलीस पाटील महत्वाचं कार्य करतात.
  6. पोलिसांना गावखेड्याच्या कामात हातभार लागावा, योग्य माहिती वेळेत मिळावी यासाठी पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावत असतात.
  7. कोरोनाकाळात केलेल्या अतिरिक्त कामांचे मानधन अजूनही मिळालेले नाही, सणासुदीच्या काळातही मानधन प्राप्त न झाल्याने पोलीस पाटलांमध्ये नाराजीचा सूर आहे.

“जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पोलीस पाटील संघटना ठिकठिकाणी निवेदन देत आहे. 2012 पासून प्रवासभत्ता मिळालेला नाही. सहा महिने झाले अजूनही मानधन नाही. सणासुदीच्या काळात तरी मानधन मिळायला हवे होते पण ते मिळाले नाही. त्यामुळे पोलीस पाटील हे गावखेड्यात काम कसे करणार ?”
दीपक पालीवाल, अध्यक्ष ( पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य )