दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेल्या मित्राशी मारामारी महागात पडली, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेल्या आपल्या मित्रासोबत भांडणे एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या या पोलिस कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेल्या मित्राशी मारामारी महागात पडली, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
jawhar police station
| Updated on: Nov 15, 2026 | 9:17 PM

दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेल्या आपल्या मित्रासोबत भांडणे एका पोलिस कर्मचाऱ्याला जीवानिशी पडले आहे. या मारामारीत मित्राने जोरदार ठोसे मारल्याने गंभीर जखमी झालेल्या या पोलिस कर्मचाऱ्याचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जव्हार येथे घडली आहे.

निलेश अमृत गभाले ( वय ३५ ) हे सुट्टी निमित्त गावी आले असताना त्यांचे त्याचा पोलिस मित्र ज्ञानेश्वर दत्तात्रय गायकवाड ( वय ४० ) यांच्याशी किरकोळ कारणावरुन भांडण झाले. मिळालेल्या माहितीनुसार जव्हार येथील गोरवाडी परिसरात हेमंत वाघ यांच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर निलेश आणि ज्ञानेश्वर यांची मारामारी झाली. हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. ज्ञानेश्वर दत्तात्रय गायकवाड हे मोखाडा येथे पोलिस खात्यात कामाला होते. तर आरोपी निलेश अमृत गभाले हे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे.

Loading...

मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव

दिवाळीच्या सुट्टीत निलेश जव्हार येथे आई-वडिलांकडे आला होता. त्याचे ज्ञानेश्वर याच्याशी भांडण झाले. निलेश याने ज्ञानेश्वरच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. त्यामुळे त्यांचे नाकाला जखम झाली आणि ते खाली कोसळले. पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला पाठीमागे गंभीर जखम झाली. नाक आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने ज्ञानेश्वर यांना परिसरातील नागरिकांना रात्री जव्हार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्रकृती बिघडत गेल्याने मृत्यू

मात्र, ज्ञानेश्वर यांची प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ७ नोव्हेंबर रोजी घोटीच्या एसएमडीटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा ११ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा जव्हार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात निलेश गभाले याला १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. त्याला भिवंडीच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us