एकनाथ शिंदेच आडवे येतील, वकील गुणरत्न सदावर्ते यांचे प्रदीप पूर्णेकर प्रकरणात खळबळजनक विधान..
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात एका मागून एक मोठे आरोप केले जात आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेत गुणरत्न सदावर्ते यांनी खळबळजनक खुलासा केला. ज्याचा कोणी विचारही केला नाही, असा आरोप त्यांनी केला.

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहे. पूर्णेकरांच्या कुटुंबियांकडून थेट शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापाैर असलेल्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर आरोप केले जात आहेत. हेच नाही तर उद्धव ठाकरे यांनीही पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भाजपाच्या नेत्यांनीही पूर्णेकरांच्या घरी भेट घेतली. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात तपास सुरू आहे. दोषी कोणीही असो त्यांना सोडले जाणार नाही. पोलिसांनी मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चाैकशीसाठी बोलावले होते. संजय राऊत सुषमा अंधारेंसारखे ठाकरे गटाचे नेतेही पूर्णेकरांच्या घरी पोहोचले होते. शिवसेना ठाकरे गटाकडून गंभीर आरोप होत असतानाच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी खळबळजनक आरोप केला.
गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणात जाहीरपणे एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले. सदावर्ते यांनी म्हटले की, मी प्रदीप पूर्णेकर यांची केस लढण्यास तयार आहे. पण मी या प्रकरणात वकील होऊ नये, याकरिता प्रयत्न केली जात आहेत. प्रदीप पूर्णेकर यांची बाजूने लढू नये, याकरिता दुसरे तिसरे कोणी नसून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आडवे येतील. मी ही गोष्ट डंकेच्या चोटवर सांगू शकतो.
गुणरत्न सदावर्ते यांच्या या विधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांनी थेट पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंची नाव घेतले. हेच नाही तर प्रदीप पूर्णेकरांची केस मी लढू नये, याकरिता ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचेही त्यांनी म्हटले. आता या आरोपांवर एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या नेत्यांकडून नक्की काय उत्तर दिले जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी पूर्णकरांच्या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांच्यावर पूर्णेकर प्रकरणात सातत्याने आरोप केले जात आहेत. प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीने आणि मुलाने मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीकडूनच हा कट रचण्यात आल्याचा दावा केला.