AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुणरत्न सदावर्ते पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंशी सहमत, थेट एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, प्रकरण तापणार

मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

गुणरत्न सदावर्ते पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंशी सहमत, थेट एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, प्रकरण तापणार
Gunratna SadavarteImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 14, 2026 | 8:17 PM
Share

29 सप्टेंबर रोजी ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर  यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाकडून ठाणे महापालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पूर्णेकर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं. पक्ष पूर्णेकर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. जोपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होऊन कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, लढा सुरूच ठेवणार असा शब्द देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबाला दिला होता. दरम्यान त्यानंतर आता अशीच भूमिका ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील  घेतली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देखील घेतली आहे. त्यानंतर त्यांनी या प्रकरणावरुन शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. पहिल्यांदा एफआयआरमध्ये नाव का नव्हतं?   पुरवणी जबाबात नाव पण आरोपी करण्यात आलेलं नाहीये.  एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्यामुळेच,  मिनाक्षी शिंदे यांचा या ठिकाणी दबाव बघायला मिळत आहे, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणावर बोलताना त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  एकनाथ शिंदे तुमच्याकडे आले होत का? असा थेट प्रश्नच त्यांनी यावेळी विचारला. भारताच संविधान आपल्या सुरक्षेच कवच आहे. या प्रकरणात गंभीर्यानं तपास होत नाही. परंतु लोक तुमच्यासोबत राजकारणापलिकडे आहेत.  एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला पाहिजे,  एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे, ते पालकमंत्री आहेत.  पालकाचा अर्थ जिम्मेदारी असतो.  लोकांना भावना व्यक्त करण्यासाठी देखील येऊ द्यायचं नाही. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर तुम्ही एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज पाहिली का? आम्ही थेट बोलणारी माणसं आहोत, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप