रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं, मिनाक्षी शिंदेंना ठाकरे सेनेचं जशास तसं उत्तर, पेडणेकर म्हणाल्या, लता एकनाथ शिंदे…

ठाण्यातील राजकारणाभोवती सध्या घडामोडी घडत आहेत. शिंदे गटाच्या विभागप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी रश्मी ठाकरेंचं नाव घेतल्यानंतर आता ठाकरे गटाने त्यांना जोरदार उत्तर दिलं आहे.

रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं, मिनाक्षी शिंदेंना ठाकरे सेनेचं जशास तसं उत्तर, पेडणेकर म्हणाल्या, लता एकनाथ शिंदे...
meenakshi shinde vs kishori pednekar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 3:39 PM

खर्या अर्थाने महिला अनाथ होत आहेत. मुंबई ठाणे नाशिकात गैंग तयार होत आहेत. ठाण्यात काय घडले? त्यात आमचे विभाग प्रमुख पूर्णेकर यांचा बळी घेतला गेला. यावर सगळा मीडिया आणि सोशल मीडियाने एकच नाव घेतले ते म्हणजे मीनाक्षी शिंदे. ठीक आहे एखादे वाद मुळावर येतील पण हा वाद जीवावर बेतला. पोलीस तपास करत आहेत. पण यंत्रणा कशा वापरल्या जात आहेत. हे पाहत असल्यामुळे काय भरवसा नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे.

ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितलं की, काल मीनाक्षी शिंदे यांची प्रेस पहिली. त्यांनी भाष्य केले खासमखास असा शब्द केला. पूर्णेकर कुटुंबाने डायरेक्ट सांगितले आहे की शिंदेनी डोक्यावर हात काढावा.

Loading...

खासमखास हा शब्द तुम्हाला का झोंबला?

खासमखास हा शब्द तुम्हाला का झोंबला? त्या पदावर नसताना तुम्ही त्यांचे नाव घेता. आरोपण समोर जायला पाहिजे त्यातून सत्य समोर येईलच. आम्ही आता एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यायच का. आम्ही पाहिले आहे अजमेरला कोण गेले. आम्ही म्हणायचे का? लता एकनाथ शिंदे यांच्या तुम्ही खासम खास आहात. तुम्ही कारण नसताना ज्या महिलेचा उल्लेख करता. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. राजकीय घराण्याच्या त्या सुनबाई आहेत. तुमच्या भूतकाळात आम्ही जाणार नाही. उगाच कारण नसताना एखाद्या राजकीय घराण्यातील महिलेचे नाव घ्यायचे. तुम्हाला सुद्धा उद्धवजी यांनी हात दिला. त्यांच्याच घरावर बोलताना भान ठेवा. कारण नसताना तुम्ही स्वतावरचे प्रसंग वाढवून घेत आहात. एकेकाळचे शांत ठाणे आता ठाणानानं होताना पाहायला मिळत आहे, असं उत्तर पेडणेकरांनी मीनाक्षी शिंदेंना दिलं आहे.

ठाकरे परिवारासाठी ठामपणे उभे राहू

आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होतायत. आम्ही समोर जात आहोत. उगवत्या सूर्याला झाकण्याचे काम करता. तुमच्यावर नाव आहे ते योग्य की अयोग्य आम्हाला नाही माहीत. पण रश्मी ठाकरे यांचे नाव घेता, त्यांचा काही सबंध आहे का? उद्धवजी यांची पत्नी असणे हा काय गुन्हा आहे का? कारण नसताना तुम्ही जर वारंवार नाव घेत असाल तर आम्ही ठाम पणे उभे राहू. कारण नसताना तुमच्या वादात आम्हाला बोलायला लावू नका. याप्रकरणी तुम्ही तुमच्यावरील आरोपांचे खंडन करण्याऐवजी रश्मी ठाकरेंचं नाव घेता. हे डिफमेशन आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी विचार करतील आणि काय कारवाई करायची ते ठरवतील, अशाही इशारा त्यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us