Pradeep Purnekar: Vinod Kambli हॉस्पिटलमध्ये असल्याचं कळताच प्रदीप पुर्णेकरांनी काय केलं? हॉस्पिटलमधला Video Viral

Pradeep Purnekar Meet Vinod Kambli Video Viral: ठाण्यातील मानपाड्यात ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यासोबत दुर्दैवी घटना घडली. पण ते एक अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व असल्याचे प्रतीक आता व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

Pradeep Purnekar: Vinod Kambli हॉस्पिटलमध्ये असल्याचं कळताच प्रदीप पुर्णेकरांनी काय केलं? हॉस्पिटलमधला Video Viral
| Updated on: Sep 30, 2026 | 3:28 PM

Pradeep Purnekar Thane Case: ठाण्यातील मानपाड्यात ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यासोबत दुर्दैवी घटना घडली. धारदार शस्त्राचे वार करून त्यांना मारून टाकण्यात आल्याची माहिती समोर आलीये. हल्लेखोरांनी आधी गोळ्या झाडल्या अन् नंतर मृत्यू झाला की नाही, याची खात्री करण्यासाठी कोयत्याने देखील वार केल्याची माहिती आता समोर येत आहे. हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने कापूरबावडी परिसरातील इन्फिनिटी रुग्णालयात दाखल केले गेले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या दरम्यान आता पुर्णेकरांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात ते विनोद कांबळी यांना भेटायला रुग्णालयात गेले होते.

हत्या झालेले प्रदीप पुर्णेकर कमालीचे संवेदनशील होते व्हायरल व्हिडिओतून समजत आहे. पुर्णेकरांची शिवसेनेचा ठाण्या वाघ म्हणून ओळख होती. लोकांच्या मदतीला नेहमी पुढे असायचे असा त्यांचा स्वभाव होता. जेव्हा त्यांना समजले की, टीम इंडियाची माजी क्रिकेटरपटू विनोद कांबळी रुग्णालयात दाखल झाला आहे, त्यावेळीच त्यांनी धावत जाऊन विनोद कांबळीची रुग्णालयात तातडीने भेट घेतली होती. ऑगस्टमध्ये 17 तारखेला त्यांनी विनोद कांबळीच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्याचे काही व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading...

प्रदीप पूर्णेकर भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनी या प्रकरणावर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना मंगळवारी घडली. मला सुमारास पावणे दहाला फोन आला; एका कार्यकर्त्याचा फोन आला आणि त्याने सांगितले की ‘बालू दादा’ यांच्यावर हल्ला झाला आहे. मी तातडीने तिथे पोहोचलो, पण तोपर्यंत सर्व काही संपल्याचे दिसले.

प्रदीप पूर्णेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते.  पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला आहे. तपासात पाच जणांची नावे समोर आली असून ज्यात पप्पा शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे. हे लोक गुन्हेगार आहेत. सर्व काही उघडकीस आल्यानंतरच आम्ही आमच्या भावावर अंत्यसंस्काप करणार असं प्रदीप यांच्या भावाने बोलून दाखवले आहे.ँ

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us