मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणावर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हटले, सणासुदीत..
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मुंबईत 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत उपोषण उपोषण नको, असे नेत्यांचे म्हणणे आहे. जरांगेंच्या आंदोलनावर प्रवीण दरेकर यांनी मोठे विधान केले.

अमित शाह हे मुंबई दाैऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. नुसती भेट नाही तर अर्धा तास अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे फोटोही पुढे आलीत. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी अमित शाह यांच्या मुंबई दाैऱ्यावर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील 19 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनावरही प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, अमित शाह नेहमी मुंबईत येत असतात. त्यांचं मुंबईवर प्रेम आहे. एशियाटीक लायब्ररीचं महत्व त्यांना माहिती आहे. विनय सहस्त्र बुद्धेंच्या नेतृत्वाखाली आलेल्या सोसायटीला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना प्रवीण दरोकर यांनी म्हटले की, सणासुदीचे दिवस आहेत, आपल्या आंदोलनामुळे सणांवर काही नको. लोकांची गर्दी रेलचेल असते, त्यामुळे असं आंदोलन संयुक्तिक होणार नाही. पोलिसांवर विनाकारण ताण येतो, आंदोलनकर्त्यांनी त्याची जाण ठेवावी. महायुतीत असल्याने महायुतीत वितुष्ट येऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.
भाजप असो, राष्ट्रवादी किंवा शिवसेना. संजय गायकवाड आणि आमदार महालेंच्या प्रश्नावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, संजय गायकवाडांचं वागणं बोलणं महाराष्ट्राला माहिती आहे. गुन्हा दाखल करायला पार्श्वभूमी असेल पोलीस योग्य माहिती घेतात, गरज असेल तर गुन्हा दाखल करतात. राऊत यांच्यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, देशाचे गृहमंत्री वारंवार येत असतील तर आनंद मानला पाहिजे.
अमित शाहांच्या दौऱ्याने विकासात भर पडत असेल तर आनंदच आहे, आपल्या उत्सवाचा मान वाडेल. तिरकस बघायची सवय असेल तर काय करावं. खड्ड्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरु आहे, असे नाशिकच्या प्रश्नावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटील 15 सप्टेंबर रोजी मुंबईला निघणार आहेत. 19 तारखेपासून त्यांचे उपोषण सुरू होईल