AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मुंबईला निघण्याआधीच सरकारपुढे मोठा पेच; नेमका तोडगा काय?

Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16वा दिवस आहे. 15 सप्टेंबर पासून ते मुंबईच्या दिशेने निघणार होते. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मुंबईला निघण्याआधीच सरकारपुढे मोठा पेच; नेमका तोडगा काय?
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 13, 2026 | 2:54 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे भगवे वादळ घेऊन 19 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे त्यांचे उपोषण होणार आहे. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. ते ऐकून मनोज जरांगे पाटील हे सुद्धा इरेला पेटल्याचे दिसून आले. त्यांनी आजपासून सलाईन, पाणी सर्व बंद करणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. तसेच आम्ही 15 तारखेला अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने जाणार असल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही न्यायदेवतेच्या भूमिकेशी बांधील पण सारकारच्या भूमिकेला बांधील नाही. सरकारच्या नियमांना आम्ही मानत नाही. फडणवीस यांनी पुन्हा एकदा मराठ्यांवर अन्याय केलाय. राज्य अस्थिर करण्याचे काम फडणवीस आणि त्यांचे सरकार करतेय. गणेशोत्सव मिरवणूक होणार नाहीत का? देवेंद्र फडणवीस यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. आमचे वकील बांधव ठरवतील की पुढे काय करायचे. पीआयने जातीवाद करुन गरीब मराठ्यांना त्रास देण्याचे ठरवले असावे. मनमानी पद्धतीने कायदा चालवणार असतील तर हा अन्याय आहे.

पुढे ते म्हणाले की, मागील वर्षी हा कायदा नव्हता का? मग आता कसा आला. मुख्यमंत्र्यांना जातीत वाद लावायचे, हिंदू सणात राज्य दूषित करायचे आहे. त्यांनी मला गोळ्या घालून मारायचे षडयंत्र रचले आहे. आम्ही 15 तारखेला इथून जाणार आणि 19 ला आम्ही मुंबईत जाणार. आजपासून मी सलाईन, पाणी सर्व बंद करणार. तुम्ही आमच्यावर अन्याय करणार हे आम्हाला मान्य नाही. याला सर्वस्वी जबाबदार फडणवीस सरकार असणार.

आझाद मैदान पोलिसांच्या पत्रात काय?

“मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आझाद मैदान, मुंबई येथे प्रस्तावित आंदोलन, उपोषण व धरणे” याबाबतचा आपण केलेला अर्ज 12 सप्टेंबर रोजी प्राप्त झाला. ज्याअर्थी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क वर्ष 11, अंक 30, मंगळवार, ऑगस्ट 26 2025/भाद्रपद , शके 1947, असाधारण क्रमांक.45, प्रधिकृत प्रकाशन अन्वये जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम 2025, ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये आंदोलकांना सार्वजनिक सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे, मेळावे, मिरवणुका इत्यादीसाठी आझाद मैदान (भाग), निश्चित करण्यात आला आहे. ज्याअर्थी, जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, 2025 च्या नियम क्र. 11 (ड) नुसार आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती, आत्मदहनाचा प्रयत्न करणार नाही किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही असे नमुद करण्यात आले आहे.

Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा