रामदास भाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावं तर त्यांचा इतिहास…; ऑडिओ क्लिपने महायुतीमध्ये वातावरण तापलं, दरेकरांनी सगळंच काढलं, शिंदे गटाला मोठा इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. रामदास कदम यांच्या वक्तव्यांवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला आहे. ते नेमकं काय म्हणाले?

रामदास भाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावं तर त्यांचा इतिहास...; ऑडिओ क्लिपने महायुतीमध्ये वातावरण तापलं, दरेकरांनी सगळंच काढलं, शिंदे गटाला मोठा इशारा
Pravin darekar Slams Ramdas kadam
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 5:53 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. आता भाजपने यामध्ये उडी घेत आक्रमकपणे भूमिका मांडली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे जरांगेंना उत्तर देत आहेत. पण त्यामध्ये भाजप-देवेंद्र फडणवीसांची बदनामी सहन करणार नाही, महायुतीत राहून सहकाऱ्यांना शिव्या द्यायच्या हे संस्कृतीत बसत नाही, असं म्हणत भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. आमदार प्रवीण दरेकरांनी पत्रकार परिषदेतून रामदास कदमांना धारेवर धरले आहे.

आम्ही असं म्हणायचं का? की पडद्याआड राहून जरांगेंना ताकद देणारे आणखी कोण होते? त्याचाही शोध यथावकाश होईल. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंगावर सोडायला, त्यांना बदनाम करायला तेव्हा कोण कोण होतं, कोणाी काय केलंय हेसुद्धा पुढे येईल. पण एखाद्या ज्येष्ठ आणि जबाबदार नेत्याने, आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी आपल्या मुलाचं मंत्रीपद सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा आणखी प्रमोश मिळण्यासाठी त्यांनी खुशाल बोलावं काही हरकत नाही, पण तुम्ही भारतीय जनता पक्षाला दोष देणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही जसे आक्रमक बोलता, वागता तसं आम्हालाही बोलता येतं, आम्हालाही वागता येतं अशा कडक शब्दांमध्ये भाजप आमदार प्रवीण दरेंकरांनी रामदास कदमांना सुनावलं आहे.

Loading...

तुम्ही एवढे आक्रमक बोलता वागता तर तुम्हाी सांगावं की, कोणत्या भाजपच्या नेत्याने शिंदेंना संपवण्याचा विडा उचलला आहे. आम्ही बोलायचं का देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कोण कोण ताकद देत होतं? त्यामुळे मला वाटतं आपण एका घरात राहतो, नांदतो तर आपण सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, असंही यावेळी प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलं आहे.

देवेंद्रजींवर आरोप झाले, देवेंद्रजींबरोबर कटकारस्थानं झाली. त्याचं आम्ही स्वागत करायचं का? शिंदेंवर आरोप झाल्यानंतर तुम्ही नेत्यांनी बोलंण हे स्वाभाविक आहे. आम्हीही सांगतो की याची चौकशी झाली पाहिजे, पण तेव्हा देवेंद्रजींबद्दल जे झालं त्याचं काय? आम्ही सांगतो मग त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असाही इशारा यावेळी दरेकरांनी दिला आहे.

दरम्यान, रामदासभाईंचा पूर्वइतिहास तपासावा लागेल, सुपारीबाज कोण आहेत. हे जगाला माहिती आहे. यामध्ये कोणाकोणाच्या सुपाऱ्या आहेत हे समोर येणार आहे. रामदास कदम हे सुपारीची भाषा चांगलं बोलतात, असा टोलाही त्यांनी यावेळी कदमांना लगावला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us