AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम सरी, वाढत्या उष्णतेपासून दिलासा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. मात्र आज अचानक काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम सरी, वाढत्या उष्णतेपासून दिलासा
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 22, 2026 | 8:41 PM
Share

राज्यात सध्या उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. विदर्भात तर तापमानाने कहर केला आहे. विदर्भातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर उर्वरीत जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये देखील अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. मात्र याचदरम्यान आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राज्यातील काही भागांमध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.  पुणे, पिंपरी चिंचवड, माथेरान, रायगड, सातारा या शहरांसह इतर काही ठिकाणी आज मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस 

पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शुक्रवारी पावसाने हजेरी लावली आहे, काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहेत.  पुणेकरांना अखेर उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र आज दुपारनंतर पुणे शहरातील अनेक भागांत प्री-मान्सूनच्या हलक्या सरी बरसल्या आणि वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला. ढगाळ हवामान, थंड वारे आणि रिमझिम पावसामुळे शहरातील वातावरण सुखद झाले असून, नागरिकांनीही या बदलाचा आनंद घेतला. विशेषतः दुपारच्या तीव्र उन्हानंतर पडलेल्या पावसामुळे उकाड्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात आणखी काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र दुसरीकडे पुण्यातील हडपसरमध्ये  तुफान पाऊस झाला आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पाण्यातून वाट काढताना पुणेकरांना चांगलीच कसरत करावी लागली.  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाने  हजेरी लावली असून सणसवाडी परिसर अक्षरशः पावसाने झोडपून निघाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं.  वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे सणसवाडी परिसरात पाणीच पाणी झाले आहे, सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे, वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे, तर शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे.  पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये देखील पावसानं हजेरी लावली असून, उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय पावसाची सुरुवात होताच चिमुकली मुलं भर पावसात भिजत आनंद घेताना पाहायला मिळालेत

पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस 

दरम्यान दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या अचानक पडलेल्या या अवकाळी पावसामुळे शहरातील रस्ते आणि काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचं पहायला मिळालं.

रायगड जिल्ह्यात पावसाची हजेरी 

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून कर्जत, खोपोली आणि खालापूर परिसरात आज रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना पावसापासून बचावासाठी धावपळ करावी लागली. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील अन्य काही भागांमध्येही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाकडून पुढील काही तासांमध्ये रायगडमधील इतर तालुक्यांमध्येही अवकाळी पावसाचा इशारा दिला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माणगावमध्येही पाऊस  

दरम्यान रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये देखील पाऊस झाला आहे. माणगाव, लोणारे आणि इंदापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. माथेरान आणि नेरळमध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे.

सातारा जिल्ह्यातही पाऊस 

दरम्यान दुसरीकडे सातारा जिल्ह्याच्या काही भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्हयातील महाबळेश्वरमध्ये रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा महाबळेश्वर धुक्यामध्ये हरवून गेल्याचं पहायला मिळालं. अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे पर्यटकांसाठी हा सुखद असा अनुभव होता. महाबळेश्वरसह तापोळा आणि प्रतापगड परिसरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी कोसळल्यानंतर पर्यटकांनी महाबळेश्वरच्या बाजारपेठेत गर्दी केल्याचं पहायला मिळालं.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ