लोकसभेच्या प्रचारात पुन्हा औरंगजेबची एंट्री, बालबुद्धीपर्यंत पोहोचली टीका

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. एकीकडे पंतप्रधान मोदी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे तर अजित पवारांनी ही शरद पवारांवर उघड टीका करायला सुरुवात केली आहे.

लोकसभेच्या प्रचारात पुन्हा औरंगजेबची एंट्री, बालबुद्धीपर्यंत पोहोचली टीका
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 10:07 PM

लोकसभेच्या प्रचारात पुन्हा औरंगजेबची एंट्री झाली आहे. महाराष्ट्रानं औरंगजेबाला गाडलं. मोदी तू कौन है म्हणत राऊतांनी थेट मोदींनाच इशारा दिला. राऊतांना नंदूरबारच्या सभेतून मोदींनी प्रत्युत्तर दिलं.. व्होटबँकेला खूष करण्यासाठी माझी कबर खोदण्याची भाषा नकली शिवसेना करत असल्याचा हल्लाबोल मोदींनी केला. तर राऊत, आपल्या औरंगजेबच्या वक्तव्यावरुन ठाम आहेत. महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्यांना गाडणार, असं राऊत म्हणत आहेत.

मोदींचे उद्धव ठाकरेंवरुन सध्या वेगवेगळी वक्तव्य येत आहेत. नंदूरबारमधून त्यांनी सोबत येण्याची ऑफरही दिली. त्याचवेळी शिवसेनेचे उल्लेख नकली असाही करतात. त्याआधी तेलंगणातून त्यांनी ठाकरेंवर जहरी टीका करताना नकली संतान अशी टीका केली. त्यावरुन उद्धव ठाकरेही चांगलेच संतापले आहेत. तर मोदींच्या नकली संतान टीकेवरुन पुन्हा, पलटवार करताना राऊत औरंगजेबवर आले.

आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेचा उल्लेख मोदी नकली शिवसेना असा करत होते. पण मोदींनी शरद पवारांच्याही राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हटलंय. त्यावरुन शरद पवारांनीही समाचार घेतला.

दुसरीकडे अजित पवार सध्या जाहीर सभांमधून, शरद पवारांवर उघडपणे निशाणा साधत आहेत. शरद पवार संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्यं करतात, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर शरद पवारांनी, दादांना बालबुद्धी म्हटलं आहे. काहींचं बालबुद्धी सारखं वैशिष्ट्य आहे. त्या बालबुद्धीनुसार ते बोलतात अशी बोचरी टीका शरद पवारांनी केली. आपल्या वक्तव्यातून शरद पवार संभ्रम निर्माण करतात आणि सोयीस्कर भूमिका बदलतात अशी टीका अजित पवारांनी केली होती.

शिंदे बंड करुन सुरतला गेल्यानंतरही अजित पवार त्यावेळी यात भाजपचा हात दिसत नाही, असं म्हणत होते. त्याचवेळी शरद पवारांनी त्यांना अधिक माहिती नाही असं सांगून दादांना उघडं पाडण्याची संधी सोडली नाही.

राष्ट्रवादीत काका पवारांच्याच विरोधात बंड करुन, अजित पवारांनी मूळ राष्ट्रवादी पक्षाची कमानच आपल्या हाती घेतली. संघर्ष कुटुंबापर्यंत पोहोचला. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशीच लढत झाली. आता टीका बालबुद्धीपर्यंत आली.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.