पुण्यात भयंकर घडलं! 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीला गोठ्यात नेलं, नको ते कृत्य करून… पोलिसही हादरले

Pune Crime : पुण्याच्या भोर तालुक्यातून एका धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर आली आहे; जिथे नसरापूर गावात एका 4 वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यात भयंकर घडलं! 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीला गोठ्यात नेलं, नको ते कृत्य करून... पोलिसही हादरले
Pune Murder Crime
Image Credit source: Google
| Updated on: May 01, 2026 | 9:47 PM

गेल्या काही काळापासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या, तसेच अनेकदा जिल्ह्यात गँगवॉरच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाला होता. अशातच आता भोरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका चिमुकलीची अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या झाल्याचे समोर आले आहे. भोर तालुक्यातील नसरापूर गावात ही घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोरमधील नसरापूर गावात संतापजनक घटना घडली आहे. एका 4 वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करून, दगडाने ठेचून तीचा खून केला आणि नंतर तीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. या घटनमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

आरोपीला ताब्यात देण्याची गावकऱ्यांची मागणी

या संतापजनक घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आरोपीला आमच्या ताब्यात देत नाहीत तोपर्यंत मृतदेह घेऊन जाऊ देणारं नाही. अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. सध्या गावकऱ्यांनी गोठ्यासमोरच ठिय्या मांडला आहे. पोलीस प्रशासन गावकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. मात्र गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे. नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले असून आरोपी नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us