अजित पवार आले आणि शरद पवार उभे राहिले…पक्ष फुटीनंतर काका आणि पुतण्या प्रथमच समोरसमोर, काय आहे निमित्त

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार मागे बारामतीमधील शालेच्या एका सरकारी कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फूटीनंतर हजर झाले होते, त्यावेळी शरद पवार यांनी व्यासपीठावर आल्यानंतर सर्व उपस्थितांना हात उंचावत नमस्कार केला तेव्हा टाळ्या आणि चित्कारांनी सभागृहातील सरकार पक्षाचे नेते स्तंभित झाले होते.

अजित पवार आले आणि शरद पवार उभे राहिले...पक्ष फुटीनंतर काका आणि पुतण्या प्रथमच समोरसमोर, काय आहे निमित्त
ajit pawar and sharad pawar meeting
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 20, 2024 | 3:47 PM

एकीकडे विधानसभा निवडणूकांचा पडघम येत्या सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्याच वेळी काका आणि पुतण्या समोर समोर बैठकीला बसणार आहेत. महाविकास आघाडीने संपूर्ण बहुमताचे सरकार असतानाही भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पाडून शरद पवार यांना धोबीपछाड दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला देखील निवडणूक आयोगाने विधीमंडळातील बहुमत ग्राह्य धरीत पक्षाचे नाव आणि चिन्ह अजितदादा गटाला दिले आहे. त्यानंतर काका शरद पवार यांची बारामती कशीही करुन काबीज करायची यासाठी सुप्रिया सुळे यांच्या समोर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना खासदारीकीला उभे करण्यात आले. त्यानंतर लोकसभेची भाजी शरद पवार जिंकले होते. आता विधानसभा निवडणूकीला दोन अडीच महिन्यांचा काळ आहे तर जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या निमित्ताने पुतण्या अजित पवार आणि काका शरद पवार पुण्यात एकत्र आले आहेत.

डीपीडीसीची बैठक पुण्यात सुरु होत असून या बैठकीत निधीवरुन राडा होण्याची शक्यता आहे. कारण आमच्या लोकप्रतिनिधींना विकास कामासाठी निधी पुरविताना हात आखडता घेतला जातो असे विरोधी फक्षाचे म्हणणे आहे.आज डीपीडीसीच्या बैठक पुण्यात नुकतिच सुरु झाली आहे. डीपीडीटीचे अध्यक्ष या नात्याने अजित पवार या बैठकीचे अध्यक्षस्थान निभावत आहेत. या बैठकीला हजर राहण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आणि शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या गाडीतून शरद पवार या बैठकीला हजर झाले आहेत. याबैठकीला दत्ता भरणे देखील हजर आहेत. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.पुण्यातील दोन्ही पालिकांचे अधिकारी, विभागीय आयुक्त असे सगळे नेते या बैठकीला हजर आहेत. या बैठकीत मोठे वाद होण्याची शक्यता आहे.

शरद पवार उभे राहीले…

गेल्यावेळी ज्यावेळी डीपीडीसीची बैठकीला शरद पवार उपस्थित राहीले होते. त्यावेळी शरद पवार यांनी संपूर्ण बैठकीत शांत बसण्याची भूमिका घेतली होती. सर्वांचे म्हणणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले होते. कोणत्याही मुद्यावर त्यांनी काहीही वक्तव्य केले नव्हेत. यावेळी मात्र बैठकीत शरद पवार ज्यावेळी अजितदादा या बैठकीला हजर झाले. त्यावेळी शरद पवार हे उभा राहीले होते. त्यानंतर आता बैठक सुरु झाली आहे. लोकप्रतिनिधीत सत्ताधारी आमदारांना किती निधी मिळणार ? विरोधी पक्षांच्या आमदारांनी निधी मिळणार की नाही यांचा अदमास घेऊन बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे.