‘शुभमदादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला, आम्हीच कात्रजचे राजे’ कोयते हवेत फिरवत घोषणाबाजी
पुण्यातील हल्ल्यातील पीडित मंदार किवळेने संपूर्ण घटनेचा क्रम सांगितला. हल्ला करण्याआधी हल्लेखोर काय बोलत होते, त्याची सर्व माहिती माहिती मंदारने पोलिसांना दिली.

पुणे : पुण्यातील सत्र न्यायालयाच्या बाहेर मंदार किवळेवर जीवघेणा हल्ला झाला. मंदार किवळेवरील हल्ल्यानं संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली. हल्लेखोरांनी मंदारचे दोन्ही हात तोडले. भर रस्यात हा रक्तरंजित थरार घडला. आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी आता या प्रकरणात मंदिर किवेळेचा जबाब नोंदवला आहे.
‘शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे. आम्हीच कात्रजजे राजे आहोत. त्यांनी आधी गोळीबार केला. नंतर कोयत्याने वार केले आणि हल्लेखोर जोराजोरात ओरडले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी शुभम नावाने ओरडत कोयते हवेत फिरवले, असे म्हणत मंदार किवळे याने फिर्यादित सगळच सांगितलं. हल्लेखोर जोरात ओरडत होते, तूच आमच्या शुभमला मारलं ना? असं विचारात माझ्यावर कोयत्याने सपासप वार केले वार केल्याचे मंदारने सांगितला.
पुण्यात मंदार किवळे याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर रात्री उशिरा पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हल्ल्याचा थरार सांगताना मंदारने हल्लेखोर नेमकं काय म्हणत होते, हे फिर्यादीत स्पष्टपणे सांगितला आहे. आधी मला तूच आमच्या शुभमला मारलं ना? असा प्रश्न दोघांनी विचारला आणि हातात असलेल्या पिस्तुलने गोळी झाडली. मात्र ती गोळी लागली नाही. त्यावेळी गाडीवर बसलेल्या एकाने याच्या डोक्यात कोयते टाका, असं म्हणत माझ्यावर कोयत्याने वार केले आणि त्यानंतर शुभमदादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे, असं म्हणत त्यांनी तिथून पळ काढला, किवळेने सांगितले.