
दिनकर थोरात, कराड, सातारा | 29 ऑक्टोंबर 2023 : कोयना धरणko परिसरात अधूनमधून भूकंपाचे धक्के बसत असतात. आता पुन्हा शनिवारी कोयना धरण परिसरात भूकंप जाणवला. सातारा कोयना नगर परिसरात रात्री 9.06 मिनिटांनी भूकंपाची नोंद करण्यात आली. 2.9 रिश्टेल स्केलचा हा भूकंपाचा धक्का असल्याची नोंद करण्यात आली. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागात गोषटवाडी गावच्या पश्चिमेला 7 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची जमिनीतील खोली सात किलोमीटर असल्याची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर झाली आहे. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
भूकंपाचा धक्क्यानंतर कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती कोयना धरणावर असलेल्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. भूकंपाच्या या धक्क्यामुळे परिसरात कुठेही कोणतीही हानी झाली नाही. तसेच कोठेही पडझड झाली नाही. भूकंपाचा हा धक्का सौम्य होता. तो कोयनानगर परिसरातच जाणवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. या भूकंपांच्या धक्क्यांची रिश्टर स्केलवर तीव्रता कमी आहे. यामुळे कोयना धरणाला कोणतीही हानी पोहचली नाही.
सातारामधील पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या परिसरास कोयनानगर म्हटले जाते. या ठिकाणी सातत्याने भूकंपाने धक्के जाणवत असतात. गेल्या वर्षभरातील हा सातवा भूंकपाचा धक्का आहे. 2023 मध्ये 8 जानेवारी पहिला भूकंप या ठिकाणी जाणवला होता. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2023 मध्ये दुसरा भूकंप आला. 6 मे 2023 रोजी तिसरा तर16 ऑगस्ट 2023 रोजी चौथा धक्का बसला होता. 7 सप्टेंबर 2023 रोजी पाचवा तर 29 ऑक्टोबर रोजी सहावा भूंकपाचा धक्का बसला. 28 ऑक्टोबर 2023 रोजी सातवा धक्का बसला.
कोयना धरण परिसरात 2021 मध्ये तब्बल 128 भूकंप जाणवले होते. त्या वर्षी सौम्य आणि अती सौम्य प्रकारच्या भूकंपाची ही मालिका सुरू होती. कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के वारंवार का जाणवतात, यावर संशोधन होण्याची गरज स्थानिक नागरिकांनी केली आहे.