2 कोटीची पाणीपट्टी थकीत ; पुण्यात राष्ट्रीय स्मारकआगाखान पॅलेसचे नळ कनेक्शन महापालिकेने तोडले ; हजारो झाडे सुकली

| Updated on: Mar 23, 2022 | 11:25 AM

पुरातत्व विभागाने (Department of Archeology) त्याची पाणीपट्टी भरणे अपेक्षित होते. मात्र वारंवार मागणी करूनही अद्याप पाणीपट्टी देण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली आहे. महापालिकेकडून पॅलेसमध्ये मुख्य वसाहत . कामगार वसाहत, बागेला एकूण तीन नळजोड देण्यात आले आहेत.

2 कोटीची पाणीपट्टी थकीत ; पुण्यात राष्ट्रीय स्मारकआगाखान पॅलेसचे नळ कनेक्शन महापालिकेने तोडले ; हजारो झाडे सुकली
aga khan palace
Image Credit source: Wikipedia
Follow us on

पुणे- शहरात महापालिकेकडून पाणीपट्टी थक्कबाकीदारावर कारवाई केली जात आहे. या कारवाईचा फाटक राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेसलाही(National Monument Aga Khan Palace)  बसला आहे. आगाखाना पॅलेसमधील तब्बल २ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकल्याने महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत पाणी पुरवठा करणारा नळ तोडण्यात (snaps water connection) आल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेसचा ताबा पुरातत्व विभागाकडे आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने (Department of Archeology) त्याची पाणीपट्टी भरणे अपेक्षित होते. मात्र वारंवार मागणी करूनही अद्याप पाणीपट्टी देण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली आहे. महापालिकेकडून पॅलेसमध्ये मुख्य वसाहत . कामगार वसाहत, बागेला एकूण तीन नळजोड देण्यात आले आहेत. शहरात सद्यस्थितीला पाणीपट्टी थकबाकीदारावर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. या नळतोडणीच्या फटका तेथील बागेला व परिसरतील हजारो झाडांना बसला आहे. ऐन उन्हाळयात पाणी मिळत नसल्याने झाडेही सुकलेली दिसून आली आहेत.

काय म्हणाले आयुक्त

पॅलेसमध्ये एकूण तीन नळांचा पुरवठा करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाकडं आगाखान पॅलेस ताबा आहे. थकीत पाणीपट्टीबाबत पुरातत्त्व विभागावारंवार मागणी करूनही ते न भरण्यात आल्याने नाईलाजावास्तव नळांचा पुरवठा बंद करत कारवाई करावी लागली. याबरोरच उन्हाची वाढटी तीव्रता लक्षात घेत महापालिका उद्याने तसेच बांधकामांसाठी स्वच्छ केलेले सांडपाणी वापरत आहे. तेच पाणी स्मारकाच्या बागेसाठी वापरणे संयुक्तिक होणार आहे. त्यामुळे या दोन्ही कारणांसाठी हा पुरवठा खंडीत केला आहे. अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

नळजोडणीची मागणी

आगाखान पॅलेसही ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाकडे गेल्यापासून ती दुर्लक्षित असल्याचे समोर आले. त्यात महापालिकेने पाणीपट्टी न भरल्याने पाणीपुरवठा थांबवला आहे. आगाखान पॅलेस ही फक्‍त ऐतिहासिक वास्तू नसून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचेही स्मारक आहे.त्यामुळे पालिकेने येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ऍड. सुनील करपे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

काय आहे आगाखान पॅलेस

आगाखान पॅलेसमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी सहावर्षे राजकैदी म्हूणन राहिले होते. या सहावर्षाच्या काळात महात्मा गांधी यांनी तिथे बाग फुलवली होती.मात्र आज पाण्याच्या अभावामुळे बागेतील झाले सुकली आहेत.तिसरे सुलतान मोह्हमद शाह आगा खान यांनी याची निर्मिती केली आहे. संपूर्ण आगाखान पॅलेस हा 19 एकरामध्ये विस्तारलेला आहे. इस्लामिक बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या पॅलेसची निर्मिती 1892 ला झाली आहे. त्यावेळी तब्बल 12  लाख रुपये निर्मितीसाठी खर्च करण्यात आला होता. त्यानतंर 1962  ला पॅलेस भारत सरकारला दान देण्यात आला आहे.

CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान

CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान

Rabi Season : लगबग सुगीची, शेतकऱ्यांचा कडधान्यावर भर, यंदा वाढणार ज्वारीचे दर..!