PHOTO | जेजुरीच्या खंडोबाला अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार अपर्ण

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरी गडावरील मार्तंड भैरवाच्या मूर्तीला अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण करण्यात आला आहे.

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 10, 2021 | 7:15 PM
1 / 5
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरी गडावरील मार्तंड भैरवाच्या मूर्तीला अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरी गडावरील मार्तंड भैरवाच्या मूर्तीला अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण करण्यात आला आहे.

2 / 5

खंडोबा देवस्थानचे विश्वस्त राजकुमार कांतीलाल लोढा यांनी त्यांच्या मातोश्री दिवंगत कमलाबाई लोढा यांच्या इच्छेनुसार हा हार अर्पण केला असल्याची माहिती लोढा यानी दिली आहे.

3 / 5

कमलाबाई लोढा यांना धार्मिक कार्याची आवड होती. त्या खंडोबाच्या भक्त होत्या, त्यांनी खंडोबाला चांदीचा हार करण्यासाठी अडीच लाख रुपये साठवले होते. परंतु ही इच्छा पूर्ण करण्याआधीच त्यांचे निधन झाले.

4 / 5

आपल्या आईची राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी लोढा कुटुंबीयांनी विधिपूर्वक खंडोबाला हार अर्पण केला.

5 / 5

यावेळी विश्वस्त राजकुमार लोढा त्यांच्या पत्नी विद्या, मुलगा सुमित उपस्थित होते. अर्पण करण्यात आलेला शुद्ध चांदीचा रत्नजडित हार मार्तंड भैरवाच्या मूर्तीला साजेसा बनवण्यात आला आहे. राजस्थानमधील कुशल कारागिरांनी हा हार तयार केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us