Pune crime : पाच हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहात अटक, तक्रारीनंतर एसीबीनं लावला होता सापळा

| Updated on: Aug 14, 2022 | 3:59 PM

विजय शिंदे यांनी आपल्याविरुद्ध सुरू केलेल्या प्रकरणाच्या कारवाईसंदर्भात लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. तसेच या तक्रारदाराने यापूर्वी एसीबीच्या पुणे युनिटशी संपर्क साधला होता.

Pune crime : पाच हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहात अटक, तक्रारीनंतर एसीबीनं लावला होता सापळा
नालासोपाऱ्यात रिक्षा माफियांची दादागिरी
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पाच हजारांची लाच घेताना एका पोलीस हवालदाराला रंगेहात अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (Anti-Corruption Bureau) ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एका 48 वर्षीय पोलीस हवालदाराला शनिवारी पुण्यात रंगेहात पकडण्यात आले. एका व्यक्तीकडून ज्याच्या विरोधात पोलिसांनी (Pune police) प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई सुरू केली होती, त्यालाच ‘चॅप्टर प्रोसिडिंग’ही म्हटले जाते, अशा व्यक्तीकडून त्याने 5,000 रुपयांची लाच घेतली. पोलिसांनी अटक केलेल्या कॉन्स्टेबलची ओळख विजय शिंदे अशी केली असून तो पुणे शहर पोलिसांतर्गत कोथरूड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police) कार्यालयात तैनात आहे. लाचप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, त्याला रविवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस त्या व्यक्तीविरुद्ध करू शकतात कारवाई

शिंदे यांनी आपल्याविरुद्ध सुरू केलेल्या प्रकरणाच्या कारवाईसंदर्भात लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. तसेच या तक्रारदाराने यापूर्वी एसीबीच्या पुणे युनिटशी संपर्क साधला होता. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, ACP कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला आणि शिंदेला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, जर ती व्यक्ती बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील होण्याची किंवा कोणत्याही प्रकारे शांतता बिघडवण्याची शक्यता आहे असे मानण्याचे कारण त्यांच्याकडे असल्यास पोलीस काही व्यक्तींविरुद्ध अशी कारवाई करू शकतात.

हे सुद्धा वाचा

दंडात्मक कारवाई

पुढे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की प्रकरणाच्या कार्यवाही अंतर्गत पोलीस अशा व्यक्तींना नोटीस बजावतात आणि त्यांना चेतावणी देतात, की अशा कोणत्याही कृतीत सामील झाल्यास दंड किंवा अटकसह दंडात्मक कारवाई केली जाईल. कार्यवाहीचा एक भाग म्हणून, त्या व्यक्तीला ACP दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहण्यास सांगितले जाते. या प्रकरणाचा तपास करणारे एसीबीचे निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी सांगितले, की कॉन्स्टेबल शिंदेला रविवारी न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, कोणीही लाच मागण्याचा प्रयत्न केल्यास लाचलुचपत विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.