अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांना डायनासोर म्हटल्यानंतर अजित पवार म्हणतात, ‘मी….’

| Updated on: Sep 30, 2022 | 8:37 PM

अजित पवार यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले म्हणाले,...

अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांना डायनासोर म्हटल्यानंतर अजित पवार म्हणतात, मी....
अजित पवार म्हणतात, 'मी....'
Image Credit source: t v 9
Follow us on

अश्विनी सातव डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या टीकेनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्यावर पलटवार केला. असा फालतू टीकेला मी महत्व देत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी अब्दुल सत्तारांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीमध्ये मुंडकी खाणारा डायनासोर आहे, अशी टीका सत्तारांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर केली होती. अजित पवार यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले म्हणाले, असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही.

अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?

मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. मुंडकी खाणारा डायनासोर आहे. अब्दुल सत्तार यांनी काल हा हल्लाबोल केला.

शिवसेना वाचवायची तर तुम्हाला काम करावं लागेल, असं मी म्हटलं होतं. महाविकास आघाडीमध्ये एकटा जीव आणि सदाशीव आहे. सकाळी सात वाजतापासून रात्री दहा वाजतापर्यंत सुरू असायचं, असं अब्दुल सत्तार काल म्हणाले.

सत्तारांच्या वक्तव्याला किंमत देत नाही

एकनाथ शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. यावर राष्ट्रवादीने सत्तारांना डिवचले आहे. सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना वेगळं बोलत होते.

मग सेनेत गेले तेव्हा वेगळं बोलायचे. ते काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. त्यामुळं त्यांच्या विधानांना आम्ही महत्त्व देत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले.