Ajit Pawar : माझ्यापेक्षा जास्त काम कुणी केलं असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील, अजित पवारांचं रोखठोक मत

| Updated on: Sep 09, 2022 | 10:53 AM

कुणीही बारामतीमध्ये यावे. बारामतीकर सर्वांचे स्वागतच करतात. मात्र मतदानाच्या दिवशी कोणते बटण दाबायचे, हे बारामतीकरांना चांगले माहीत आहे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : माझ्यापेक्षा जास्त काम कुणी केलं असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील, अजित पवारांचं रोखठोक मत
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : असे कितीतरी जण आले आणि गेले 55 वर्षांत. पण बारामतीकरांना (Baramati) माहिती आहे, कुणाचे बटण दाबायचे ते, असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपाला लगावला आहे. अखिल मंडई गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूकप्रसंगी ते बोलत होते. खूप चांगल्या पद्धतीने आजपर्यंत कार्यक्रम पार पडले आहेत. कोरोनानंतर यंदा मिरवणूक निघत आहे. मंडईपासून सुरू होणाऱ्या मिरवणुकीत आम्ही सहभागी होणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. तसेच सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आज विसर्जनाचा दिवस आहे. काहींनी आठव्या, नवव्या दिवशी विसर्जन केले. कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करता येत नव्हता. यंदाचा गणेशोत्सव (Pune Ganeshotsav)सगळ्यांनी अतिशय आनंदाने, चांगल्या प्रकारे पार पाडला, असे अजित पवार म्हणाले.

‘दर्शनाला जायचे तर मनमोकळेपणाने जावे’

दर्शनाला आल्यानंतर प्रत्येकवेळा बाप्पाकडे मागणेच मागावे असे काही नाही. बाप्पा येतो, सर्वांना दर्शन देतो. पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो किंवा इतर कोणत्या दर्शनाला गेलो, की आमकं साकडं घातलं, तमकं साकडं घातलं, हे असले मला आवडत नाही. दर्शनाला जायचे तर मनमोकळेपणाने जावे. सारखे साकडे घालून कशाला अडचणीत आणायचे, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

‘बारामतीत माझे काम बोलते’

बारामतीच्या राजकारणाविषयी ते म्हणाले, की बारामतीत माझे काम बोलते. माझ्यापेक्षा कुणी जास्त काम केले असेल तर बारामतीकर त्याचा विचार करतील. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनाही वाटते आपण काहीतरी करतो. ते बारामतीला आले म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. इतर कुठे गेले असते तर त्यांना तुम्ही इतकी प्रसिद्धी दिली नसती. तुम्ही इतके संघटनेमध्ये इतके सक्रिय होतात, मग पक्षाने तुम्हाला, तुमच्या पत्नीला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर द्या, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना अजित पवार यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले अजित पवार?

‘बारामतीकर सर्वांचे स्वागतच करतात’

कुणीही बारामतीमध्ये यावे. बारामतीकर सर्वांचे स्वागतच करतात. मात्र मतदानाच्या दिवशी कोणते बटण दाबायचे, हे बारामतीकरांना चांगले माहीत आहे, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याबद्दल त्यांनी स्वागत केले. तर निर्बंधांवरून महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या सध्याच्या सरकारवरही त्यांनी टीका केली.