Ajit Pawar : बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल, अजित पवारांचा फडणवीसांना इशारा

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल असा इशारा अजित पवारांनी दिलाय.

Ajit Pawar : बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल, अजित पवारांचा फडणवीसांना इशारा
देवेंद्र फडणवीस, अजित पवारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 1:30 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र सुरू आहे, महाराष्ट्रात बारामती येतेच असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्याचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही, त्यापेक्षा भाजपाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. गेल्यावेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यासहित सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं. मतदारसंघातून दरवेळी लाखाच्या मताधिक्याने निवडून येतो. असा खोचक टोला अजित दादांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी भाजपच्या मिशन बारामतीचा यावेळी जोरदार समाचार घेतला आहे. बारामतीला धडका मारून काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. गेल्यावेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांचे डिपॉडझिट जप्त झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, मी रोज सकाळी 6  ला कामाला सुरुवात करतो. मी माझ्या मतदारसंघात लाखाच्या मताधिक्याने विजयी झालो आहे. आपली ताकद मोठी आहे असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांना इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे.  शिंदे सरकार स्थगिती सरकार आहे. सध्या विकास कामांना स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष चांगले काम केलं होतं. यांना कोणी खोके सरकार म्हटलं की राग येते असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

Non Stop LIVE Update
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.